शरद पवारांच्या कार्यपद्धतीने प्रभावित, संदीप देशपांडे ‘सिल्व्हर ओक’वर

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या कामगिरीबाबत शरद पवार यांनी भेटीमध्ये माहिती घेतली. माहीममध्ये मनसेच्या पराभवाची कारणंही पवारांनी जाणून घेतली.

शरद पवारांच्या कार्यपद्धतीने प्रभावित, संदीप देशपांडे 'सिल्व्हर ओक'वर
Follow us
| Updated on: Oct 30, 2019 | 12:30 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीतील मनसेचे उमेदवार आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट (Sandeep Deshpande meets Sharad Pawar) घेतली. पवारांच्या कार्यपद्धतीबाबत प्रभावित होऊन देशपांडेंना शरद पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.

संदीप देशपांडे यांनी आज सकाळी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार आणि देशपांडे यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. पुढच्या सात-आठ दिवसांत शरद पवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

संदीप देशपांडे मनसेच्या तिकीटावर माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकांच्या रिंगणात उतरले होते. मात्र शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी 18 हजार 647 च्या मताधिक्याने देशपांडेंना पराभूत केलं. संदीप देशपांडे 42 हजार 690 मतं मिळवत दुसऱ्या स्थानावर, तर काँग्रेस उमेदवार प्रविण नाईक तिसऱ्या क्रमांकावर होते. माहीममध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांमुळे विजयाचे गणित बिघडल्याचा दावा देशपांडेंनी केला.

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या कामगिरीबाबत शरद पवार यांनी भेटीमध्ये माहिती घेतली. माहीममध्ये मनसेच्या पराभवाची कारणंही पवारांनी जाणून घेतली. माहिम आणि नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मनसेची स्थिती चांगली आहे, अशी माहिती पवारांपर्यंत पोहचली होती. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मनसेला विजय मिळेल, अशी त्यांना आशा होती.

नाशिक मध्य मधून भाजपच्या देवयानी फरांदेविरोधात नितीन भोसले रिंगणात होते, तर काँग्रेसने हेमलता पाटील यांना तिकीट दिलं होतं. मात्र फरांदेंना आपली जागा टिकवण्यात यश आलं.

लोकांना भाजपविरोधात मतदान करायचे आहे, पण विरोधी पक्षांची आघाडी अजून विस्कळीत असल्यामुळे यंदा अपेक्षित लक्ष्य गाठता आलं नाही, असं पवार देशपांडेंना म्हणाले. पुढच्या काळात सर्व विरोधी पक्षांना एकजूट दाखवावी लागेल, असं मतही पवारांनी (Sandeep Deshpande meets Sharad Pawar) या भेटीत व्यक्त केलं.

मनसेला मतदान करणारा ‘मराठी माणूस’ शिवसेनेकडे!

माहिम आणि दादर परिसरात मनसेने जोरदार प्रचार केला होता. ‘बिग बॉस मराठी 2’ चा विजेता शिव ठाकरे, अभिनेत्री स्मिता तांबे, आणि नृत्यांगना फुलवा खामकर यांच्यासह मराठी कलाकार मनसेच्या प्रचारासाठी आले होते. परंतु माहिममध्ये शिवसेनेचीच हवा दिसली.

खळ्ळ-खटॅक फेम संदीप देशपांडे

संदीप देशपांडे हे मनसेच्या तिकीटावर मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले होते. संदीप देशपांडे यांनी ईव्हीएमच्या मुद्दयावरुन सरकारवर अनेक वेळा तोफ डागली आहे. पत्रकार परिषदेला घाबरणारे पंतप्रधान ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या साहसी खेळात कसे सहभागी होतात? असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी थेट पंतप्रधानांना सवाल केला होता.

मुंबई मेट्रोच्या भूमिपूजनाच्या शिळेवर मराठी भाषेला बगल दिल्याबद्दलही संदीप देशपांडेंनी सरकारवर टीका केली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.