सिंधुदुर्गातील नेत्यासाठी नाणारचा खटाटोप : खासदार विनायक राऊत
भाजपला टक्कर (Nanar project Shivsena Bjp) देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांसोबत मैदानात उतरली आहे. नाणार जवळील तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली.
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन भाजप-शिवसेनेत (Nanar project Shivsena Bjp) वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या रिफानरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनानंतर आता याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू लागले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर (Nanar project Shivsena Bjp) देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांसोबत मैदानात उतरली आहे. नाणार जवळील तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली. नाणार प्रकल्प सिंधुदुर्गातील एका नेत्यासाठी आणला जात असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. त्यामुळे नाणार रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात विधानसभेची निवडणूक गाजणार असल्याचे दिसत आहे.
रिफायनरी प्रकल्पाचा निषेध करताना खासदार विनायक राऊत यांनी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे नाव न घेता टीका केली. “हा प्रकल्प हा सिंधुदुर्गातील एका नेत्यासाठी आणला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या नेत्याच्या 300 एकर जमिनीचे तीन हजार कोटी रुपये या प्रकल्पामुळे अडकले आहेत. त्यामुळे या सर्व खटाटोप सुरु असल्याचे विनायक राऊत म्हणाले. या प्रकल्पाच्या समर्थकांना लोकसभेत मिळालेल्या 298 मतांवरून त्यांची लायकी काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी तपासावे असा उपरोधिक टोलाही विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.”
कोकणात महाजनादेश यात्रेनिमित्त आलेल्या मुख्यमंत्र्यांनी (Nanar project Shivsena Bjp) रद्द झालेल्या नाणार रिफानरीबद्दल सकारात्मक भूमिका घेतली. यामुळे या प्रकल्पाला एक प्रकारे समर्थन दर्शवले गेले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा चर्चा केली जाईल असे सांगत मुख्यमंत्र्यांकडून या प्रकल्पाचे समर्थन केलं गेलं. या विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेल्याचे पहायला मिळत आहे. या विधानाचे राजकीय पडसाद नाणार पंचक्रोशीत उमटत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाणार रिफायनरी विरोधी समितीकडून रविवारी (22 सप्टेंबर) राजापुरातील तारळ इथं निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक याठिकाणी उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत प्रकल्पग्रस्तांकडून प्रकल्पाचा जाहीर निषेध करत मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवला. जर हिमत असेल, तर नाणारमध्ये येऊन चर्चा करुन दाखवा असे खुलं आवाहनही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केले.
हजारो प्रकल्पग्रस्तांसोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी सुद्धा प्रकल्पाच्या विरोधातील सूर आळवला. “नाणार प्रकल्पासाठी इंचभर देखील पाय ठेऊ देणार नाही”, असा इशारा राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी यावेळी दिला. नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी गावात आलात, तर याद राखा, नाणारसाठी गावात पायही ठेवू देणार नाही”,अशी भूमिका साळवी यांनी घेतली आहे.
यामुळे एकूणच काय, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सेना आणि भाजप यांच्यात कोकणात राजकीय शिमगा रंगलेला पहायला मिळत आहे. त्यामुळेच नाणार रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात विधानसभेची निवडणूक गाजणार असल्याचे दिसत आहे.