पुण्यात ‘राज’गर्जना घुमण्यात अडचण, राज ठाकरेंना सभेसाठी मैदान मिळेना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नऊ ऑक्टोबरच्या सभेसाठी मैदानच मिळत नाही. अखेर, टिळक चौकातच सभा घेण्याची परवानगी मिळवण्यासाठी मनसेची पोलिस आयुक्तांकडे धावाधाव सुरु आहे.
पुणे : विधानसभा निवडणुकांच्या मैदानात उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या बुधवारपासून प्रचारांचा धडाका सुरु करणार आहे. मात्र मनसेला पुण्यात जाहीर सभा घेण्यासाठी मैदान मिळण्यात अडचणी (No Grounds For Raj Thackeray Campaign) येत असल्याचं समोर आलं आहे. मैदान नसल्याने पूर्वीप्रमाणे टिळक चौकातच सभा घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मनसेतर्फे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही दिवस उरले असल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नऊ ऑक्टोबरच्या सभेसाठी मैदानच मिळत नाहीये. अखेर, टिळक चौकातच सभा घेण्याची परवानगी मिळवण्यासाठी मनसेची पोलिस आयुक्तांकडे धावाधाव सुरु आहे.
गाड्यांचा नंबर, पहिली सभा ते उमेदवार यादी, राज ठाकरेंचा लकी नंबर
रविवारी असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाल्यावर बुधवारी (9 ऑक्टोबर) राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन (No Grounds For Raj Thackeray Campaign) मनसेकडून करण्यात येत आहे. पहिल्या सभेसाठी मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला आहे. राज ठाकरे हे 9 हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा 9 या नंबरभोवती फिरताना दिसतो.
राज ठाकरेंच्या सभेसाठी मध्य वस्तीतील मैदान उपलब्ध होत नसल्याचा दावा मनसेने केला आहे. शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागण्यात आली होती; मात्र ती नाकारण्यात आली. काही संस्थांनी तुमच्या सभेसाठी जागा देता येणार नाही, असा पवित्रा घेतल्याचंही मनसेने सांगितलं.
‘शहरातील शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना सभांसाठी मैदानेच मिळत नाहीत’ असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष आणि कसबा पेठेतील उमेदवार अजय शिंदे यांनी केल्याची माहिती आहे.
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, शर्मिला ठाकरे किरकोळ जखमी
शैक्षणिक संस्थांची मैदाने उपलब्ध होत नसल्याची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे करण्यात आली आहे. कोणतीच मैदाने उपलब्ध होत नसतील, तर पूर्वीप्रमाणे टिळक चौकाची जागा सभेसाठी देण्यात यावी, अशी विनंती मनसेने पोलिस आयुक्तांकडे केली आहे.