देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीची घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड
Follow us
| Updated on: Dec 01, 2019 | 1:12 PM

मुंबई : विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड (Oppostion Leader Devendra Fadnavis) झाली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तांदोलन करत फडणवीसांचं अभिनंदन केलं.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांची अभ्यासू नेते अशी ओळख आहे.

माजी मुख्यमंत्र्यांना आता थेट विरोधीपक्षनेतेपदाच्या भूमिकेत शिरावे लागणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. परंतु अजित पवारांचं बंड शांत होताच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बहुमताअभावी फडणवीस सरकार कोसळलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.

देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द

देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (1992 आणि 1997) निवडून आले. नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.

जलसिंचन नाही, अजित पवारांकडे आता ‘हे’ मंत्रिपद?

देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपीठांनी गौरवलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिवपदी ते कार्यरत आहेत.

लोकप्रतिनिधित्व

  • 2014 ते 2019 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
  • 1999 ते आतापर्यंत सलग पाचवेळा महाराष्ट्र विधानसभा सद्स्य
  • 1992 ते 2001 सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर, मेयर इन कॉन्सिल पदावर फेरनिवड, असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव

राजकीय टप्पे

  • 2013 – अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • 2010 – सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
  • 2001 – राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • 1994 – प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
  • 1992 – अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
  • 1990 – पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
  • 1989 – वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

विधिमंडळातील कार्य

अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास आणि गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती

Oppostion Leader Devendra Fadnavis

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.