तीन दिवसात आमदाराची पलटी, राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा शिवसेनेत परतणार?

गेल्या आठवड्यात शिवसेनेत बंडखोरी करत राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेले पालघरचे बंडखोर आमदार अमित घोडा हे आता स्वगृही परतणार असल्याची माहिती आहे (Amit Ghoda back in Shivsena). शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आज (7 ऑक्टोबर) अमित घोडा हे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.

तीन दिवसात आमदाराची पलटी, राष्ट्रवादीत गेलेले अमित घोडा शिवसेनेत परतणार?
Follow us
| Updated on: Oct 07, 2019 | 8:52 AM

पालघर : गेल्या आठवड्यात शिवसेनेत बंडखोरी करत राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेले पालघरचे बंडखोर आमदार अमित घोडा हे आता स्वगृही परतणार असल्याची माहिती आहे (Amit Ghoda back in Shivsena). शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आज (7 ऑक्टोबर) अमित घोडा हे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीसमोर अमित घोडा यांची मनधरणी करण्याचं आव्हान आहे (MLA Amit Ghoda leave NCP). या सर्व घटनेमुळे सध्या पालघरच्या राजकारणात अनेक रंजक घडामोडी घडण्याची शक्यता आहे (Palghar Assembly Elections).

राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गळती लागली असतानाच पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अमित घोडा यांनी 3 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला (MLA Amit Ghoda leave NCP). आमदार अमित घोडा यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला. मात्र, आता ते त्यांची उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे, रविवारी (6 ऑक्टोबर) दुपारपासून अमित घोडा यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांच्या ते संपर्कात नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली.

एकनाथ शिंदेंची खेळी सफल, अमित घोडा मातोश्रीच्या छायेत

आमदार अमित घोडा यांनी तीन दिवसांपूर्वी शिवसेनेतून बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पालघर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारी अर्जही दाखल केला. मात्र, शिवसेनेच्या दबावानंतर अमित घोडा हे त्यांचा अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा आहे.

मातोश्रीवरुन दबाव वाढल्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली चक्र फिरवली आणि अमित घोडा यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे अमित घोडा हे राष्ट्रवादीची उमेदवारी मागे घेत पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने नाराज होऊन अमित घोडा यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, आता पुन्हा ते शिवसेनेत जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पक्षात टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर आहे. तसेच, जर अमित घोडा यांनी उमेदवारी मागे घेतली तर पालघर मतदारसंघातून राष्ट्रवादीला नवा उमेदवार उभा करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या पालघरमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.