कपाळावर भंडारा, बुलेटवर एण्ट्री, रोहित पवारांचं सेलिब्रेशन सुरु
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे पहिल्या फेरीपासून अहमदनगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातून आघाडीवर (Rohit pawar lead in assemble election) आहेत.
अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे पहिल्या फेरीपासून अहमदनगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातून आघाडीवर (Rohit pawar lead in assemble election) आहेत. त्यामुळे रोहित पवार हे विजयाकडे कुच करत आहेत. रोहित पवार प्रत्येक फेरीत आघाडी घेत असल्याने जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष सुरु (Rohit pawar lead in assemble election) झालाय. यामध्येच रोहित पवार यांनी कपाळावर भंडारा लावत थेट बुलेटवरुन एण्ट्री करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्याविरोधात पालकमंत्री आणि भाजपचे नेते राम शिंदे उभे होते. राम शिंदे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. तसेच भाजपच्या मंत्रीमंडळातही त्यांना स्थान होते. या मतदारसंघात त्यांना थेट रोहित पवार यांनी आव्हन केल्यामुळे येथील लढत ही चुरशीची बनली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वीच जामखेडमधून रोहित पवार यांचा विजय होणार असं मत तेथील जनतेनेही व्यक्त केलं होते.
राम शिंदे यांची जागा धोक्यात आहे, असं भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व्हेत स्पष्ट झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट निवडणुकीपूर्वीच शिंदेंना मंत्रीपद जाहीर केलं होते. जेवढी जास्त मतं तेवढे मोठं मंत्रीपद, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
“मला मोटरसायकल आवडते. त्यामुळे मला असं वाटलं की कार्यकर्त्यांसोबत मोटरसायकलवरुन यावं. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढली आहे. विकासचं आणि बदलाचं वारं आता कर्जत-जामखेडमध्ये यायला लागलं आहे. जो निकाल लागणार आहे, तो पॉझिटिव्ह लागणार आहे आणि त्याचे सर्व श्रेय हे कार्यकर्त्यांचे आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
विशेष म्हणजे काल (23 ऑक्टोबर) मतमोजणीपूर्वीच कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या विजयाचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात होते. या फलकावर रोहित पवार यांना विजय झाल्याबद्दलच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.