मुनगंटीवार सारखे ‘गोड बातमी’ म्हणतात, कोणी बाळंत होणार आहे का? : सामना

आता ही गोड बातमी म्हणजे कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे 'लग्न' वगैरे ठरले आहे? असा खोचक प्रश्न 'सामना'तून विचारण्यात आला आहे

मुनगंटीवार सारखे 'गोड बातमी' म्हणतात, कोणी बाळंत होणार आहे का? : सामना
Follow us
| Updated on: Nov 07, 2019 | 7:49 AM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुटलेला नसतानाच ‘सामना’च्या माध्यमातून शिवसेनेचे भाजपवर तिरकस बाण सुटतच आहेत. मुनगंटीवार वारंवार ‘गोड बातमी’चे दाखले देत आहेत, सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे का? असा खोचक प्रश्न ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला (Saamana on Sudhir Mungantiwar) आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार वारंवार ‘गोड बातमी’चे दाखले देत आहेत. आता ही गोड बातमी म्हणजे कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे ‘लग्न’ वगैरे ठरले आहे? अर्थात गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी ‘पाळणा’ हलणार का? तो कसा हलेल? हे प्रश्न आहेतच, असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे, ती म्हणजे “शिवसेनेचा” मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार आहे. महाराष्ट्राच्या नशिबी एक स्वाभिमानी सरकार येणार व तसे भाग्य मऱ्हाटी जनतेच्या ललाटी लिहिले असेल तर ती भाग्यरेषा पुसण्याची ताकद कुणात नाही. कारण ही भाग्यरेषा भगवा आहे, असंही अग्रलेखात पुढे म्हटलं आहे.

मुनगंटीवारांकडूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय ही गोड बातमी मिळेल : संजय राऊत

‘राज्यात महायुतीचेच सरकार येईल असं चंद्रकांत पाटील म्हणतात, त्यांच्या तोंडात साखर पडो. पण हे सरकार कधी येईल आणि ती महायुती नक्की कोणाची व कशी, हे दादा वगैरे मंडळींनी सांगितलं नाही’ असा टोलाही ‘सामना’तून लगावण्यात आला आहे. ‘बिन आमदारांचे महामंडळ’ असं म्हणत महायुतीतील घटकपक्ष रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना आणि शिवसंग्राम यांना टोमणा मारण्यात आला आहे.

याआधी, “राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा ही शेतकऱ्यांसह सर्वांची इच्छा आहे. सुधीर मुनगंटीवार हे गेल्या काही दिवसांपासून लवकरच गोड बातमी मिळेल असे सांगत आहे. बहुतेक ही गोड बातमी त्यांच्याकडूनच तुम्हाला कळेल की, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय,” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं (Saamana on Sudhir Mungantiwar) होतं.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.