शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर माझ्यावर हसायचे, आज मी हसतोय : राऊत

मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार. पण कोणी विश्वास ठेवत नव्हतं, असं संजय राऊत म्हणाले

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार म्हटल्यावर माझ्यावर हसायचे, आज मी हसतोय : राऊत
Follow us
| Updated on: Nov 27, 2019 | 11:04 AM

मुंबई : शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, पण कोणी विश्वास ठेवत नव्हतं, सगळे माझ्यावर हसायचे, आता मी हसतोय, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. गेल्या महिनाभरापासून रोज सकाळी पत्रकार परिषद घेण्याच्या शिरस्त्याला फुलस्टॉप देत असल्याचं राऊतांनी (Sanjay Raut on Shivsena CM) जाहीर केलं.

‘आज एक महिना झाला, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार. पण कोणी विश्वास ठेवत नव्हतं. उद्या उद्धव ठाकरे शपथ घेत आहेत. जनता स्वागत करत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय देशाच्या हिताचा आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

अघोरी प्रयत्न करुन सत्ता राखण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्राच्या जनतेने अघोरी प्रथेला घरी बसवलं. असे प्रयोग महाराष्ट्रात चालणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांबद्दल मला काहीच बोलायचं नाही, असं राऊत म्हणाले.

आजपासून माझी जबाबदारी कमी झाली, महाराष्ट्रात नवं सरकार येत आहे. मुख्यमंत्री नवे येत आहेत. ते काम करतील. देशाच्या परिवर्तनाची ही सुरुवात आहे. महाराष्ट्राचा अपमान केलात, म्हणून त्याचा पलटवार केला आहे, असंही राऊत म्हणाले.

मी चाणक्य वगैरे नाही मी योद्धा आहे, जीवनात परिणामांची चिंता मी केली नाही, साहेबानी मला नेहमी आशीर्वाद दिलेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे उपस्थित राहणार?

जेव्हा चंद्रयानाची गडबड झाली होती, तेव्हा सांगितलं होतं आमचं सूर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरक्षित उतरेल. आता काळजी नाही. सामना हे सामना आहे, माझी इथली जबाबदारी संपली, असं मी मानतो. मी तटस्थपणे पाहतो, कशात अडकून पडत नाही. पवार साहेब आणि मी एकत्र बसलो होतो, तेव्हा आमच बोलणं सुरु झालं. तेव्हा आम्ही ठरवलं आता दिल्लीत जाऊन काम करु, असंही राऊत पुढे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते पुढील निर्णय घेतील, अजित पवारांची घरवापसी होईल, असं मी आधीच म्हटलं होतं, 100 जन्म पवारांना ओळखायला लागतील म्हटलं होतं, याची आठवणही संजय राऊतांनी (Sanjay Raut on Shivsena CM) करुन दिली.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.