विधानसभेसाठी महाराष्ट्रात शरद पवार-प्रियांका गांधींच्या एकत्र प्रचारसभा
पश्चिम महाराष्ट्रातील दोन रॅलींमध्ये शरद पवार आणि प्रियांका गांधी एकत्र येणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे दोन दिग्गज नेते पहिल्यांदाच एका जाहीर व्यासपीठावर एकत्र येणार आहेत
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसल्याचं दिसत आहे. निवडणुकांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी आपली हुकूमाची पानं बाहेर काढली आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी महाराष्ट्रात 20 रॅली घेणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रियांका गांधी यांची एकत्रित प्रचारसभा (Sharad Pawar Priyanka Gandhi Rally) होणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 125-125 आणि मित्रपक्ष 38 असा आघाडीचं जागावाटप ठरलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज नेत्यांची एकत्र सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रियांका गांधी आणि शरद पवार पहिल्यांदाच एका रॅलीमध्ये एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील दोन रॅलींमध्ये शरद पवार आणि प्रियांका गांधी एकत्र (Sharad Pawar Priyanka Gandhi Rally) येणार आहेत. याशिवाय विदर्भात यवतमाळ, नागपूर जिल्ह्यात; मराठवाड्यामध्ये दोन जिल्ह्यात, तर खानदेशात तीन ठिकाणी रॅली होणार आहे.
सोनिया गांधी महाराष्ट्रात 8 रॅली घेणार आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नंदुरबार, औरंगाबाद, बीड या ठिकाणी सोनिया गांधी सभा घेणार आहेत. तर राहुल गांधी यांची सभा विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव अशा वेगवेगळ्या पाच भागांमध्ये होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर काँग्रेस रॅलीची तारीख जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्या प्रचार सभा घ्याव्यात (Sharad Pawar Priyanka Gandhi Rally) अशी विनंती महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आली होती.
आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेसचा तगडा उमेदवार, बाळासाहेब थोरातांचा निर्धार
काँग्रेसच्या छाननी समितीमध्ये 100 उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी पन्नास जणांची पहिली उमेदवार यादी उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार आहे.
एकीकडे पक्षात सुरु असलेली गळती आणि निवडणुकीत झालेली वाताहत पाहता काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जम्बो प्लॅनची तयारी (Congress Candidate against Aditya Thackeray) केली आहे. काँग्रेसने वरिष्ठ नेते आणि माजी खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. दिल्लीतील वरिष्ठांनी त्याबाबत सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पहिल्यापासून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. हायकमांडमुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. आता ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे वृत्त फेटाळले. पक्षाने असं काहीही सांगितल्याचे, विचारले नसल्याचा दावा या नेत्यांनी केला. काँग्रेसकडे अनुभवी उमेदवारांची वानवा असताना, माजी खासदार, नेते विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक दिसत नसल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले काँग्रेसचे दिग्गज नेते
- अशोक चव्हाण
- सुशीलकुमार शिंदे
- मिलिंद देवरा
- संजय निरुपम
- एकनाथ गायकवाड
- प्रिया दत्त
- नाना पटोले
- माणिकराव ठाकरे
- राजीव सातव (निवडणूक लढली नाही)