शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण, ‘मातोश्री’वर रात्रभर खलबतं

सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची 'मातोश्री' निवासस्थानी रात्रभर खलबतं सुरु होती.

शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण, 'मातोश्री'वर रात्रभर खलबतं
Follow us
| Updated on: Nov 11, 2019 | 7:53 AM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी सेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’ निवासस्थानी रात्रभर खलबतं (Shivsena Meeting on Government Formation) सुरु होती.

‘मातोश्री’वर रात्री चार तास शिवसेना नेत्यांची बैठक चालली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्यात ही बैठक झाली. मात्र या सभेनंतर कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया देणं टाळलं.

‘मी ‘मातोश्री’वर नव्हतो त्यामुळे मला काहीही माहीत नाही. उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची अधिकृत भूमिका सांगतील. शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार? दिल्लीला कोण जाणार हे सगळं उद्धव ठाकरे ठरवतील, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं.

अरविंद सावंत राजीनामा 

पाठिंब्याबाबत चर्चा करायची झाल्यास शिवसेनेने भाजपशी सर्व संबंध तोडावेत, एनडीएमधून आणि पर्यायाने सत्तेतून बाहेर पडावं, अशी अट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी घातली होती. त्यानंतर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. ‘शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे’ अशा शब्दात अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला.

सावंत यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची धुरा आहे. अरविंद सावंत सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

BREAKING | शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

भाजपने सत्तास्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. आता सत्तास्थापनेसाठी शिवसेना दावा करणार का, बहुमताचा आकडा कसा जमवणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या मतावर ठाम आहेत. शिवसेनेकडे संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतची वेळ असल्यामुळे सर्वांचेच लक्ष शिवसेनेकडे लागले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena Meeting on Government Formation) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेटण्यासाठी दिल्लीला रवाना होत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास…

पर्याय 1

शिवसेना- अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + काँग्रेस (44) + राष्ट्रवादी (54) = 162 बविआ (3) + समाजवादी पक्ष (02) + स्वाभिमानी (01) = 162+06 = 168 बहुमताचे संख्याबळ – 145

पर्याय 2

राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि काँग्रेस तटस्थ राहिली तर सभागृहाचे संख्याबळ 288 वजा 44 = 244 शिवसेना – अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + राष्ट्रवादी (54)+ काँग्रेस समर्थक अपक्ष (04)  =  122 बहुमताचे संख्याबळ – 123

काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचं सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादी खेळू शकते, अशी चर्चा आहे.

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.