‘रोज अग्रलेख लिहा, 9 वाजता पत्रकार परिषद घ्या, ‘विक्रम-वेताळ’नंतर आता ‘उद्धव-बेताल’ची कथा’

नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीकेची झोड उठवत असतानाच आता रा. स्व. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’ मधून संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ‘पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय…’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर […]

'रोज अग्रलेख लिहा, 9 वाजता पत्रकार परिषद घ्या, 'विक्रम-वेताळ'नंतर आता 'उद्धव-बेताल'ची कथा'
विरोधकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अधिवेशन होऊनच द्यायचं नाही, ही आडमुठी भूमिका लोकशाहीच्या विरोधात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
Follow us
| Updated on: Nov 04, 2019 | 9:09 AM

नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीकेची झोड उठवत असतानाच आता रा. स्व. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’ मधून संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ‘पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय…’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाणा (Tarun Bharat Criticises Shivsena) साधण्यात आला आहे.

‘रोज अग्रलेख लिहिणं आणि नंतर 9 वाजता पत्रकार परिषद घेत फिरणं, बातम्या पेरणं यामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा कारभार चालवून दाखवणं यामध्ये अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची?’ असा टोला ‘तरुण भारत’ मधून लगावण्यात आला आहे.

‘पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या…. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय… आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही… तशी ती आजही करण्याची गरज नाही…. महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकंच जळजळीत वास्तव आहे. शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी घालवली. हा ‘बेताल’ मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळवण्याच्या मागे लागला आहे. ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

‘बाळासाहेब ठाकरे हयात असते तर…’, रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

‘भाजप आज सरकार स्थापन करु शकत नाही, असे अजिबात नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून तो कुठल्याही क्षणी दावा करु शकतो आणि शपथविधी सुद्धा लगेच होऊ शकतो. हे ‘बेताल’ रोखठोकपणे ठोकून देतात की, भाजपला 105 जागा मिळाल्या, कारण शिवसेना सोबत होती. अन्यथा भाजपाला 70 जागा तेवढ्या मिळाल्या असत्या. उद्या भाजपने असे म्हटले की, सेनेला 56 जागा मिळाल्या, कारण भाजप सोबत होती, अन्यथा 20 सुद्धा मिळाल्या नसत्या, तर काय? ‘खोटं बोल पण रेटून बोल’ याचे समर्थन करायचे तरी कसे?’ अशी टीकाही शिवसेनेवर करण्यात (Tarun Bharat Criticises Shivsena) आली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.