वांद्र्यात तृप्ती सावंतांकडून पादचारी पुलाचं भूमिपूजन, श्रेयवादावरुन समर्थक आक्रमक

तृप्ती सावंत यांच्या हस्ते वांद्रे पूर्व परिसरात पादचारी उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं.

वांद्र्यात तृप्ती सावंतांकडून पादचारी पुलाचं भूमिपूजन, श्रेयवादावरुन समर्थक आक्रमक
Follow us
| Updated on: Nov 03, 2019 | 5:12 PM

मुंबई : दुसऱ्याच्या मेहनतीचे श्रेय घेणाऱ्यांना पुन्हा तेच भोगावे लागेल, अशा शब्दात शिवसेना बंडखोर तृप्ती सावंत यांच्या समर्थकांनी शिवसेनेला नाव न घेता इशारा दिला. सावंत यांच्या हस्ते वांद्रे पूर्व परिसरात पादचारी उड्डाणपुलाच्या कामाचं भूमिपूजन (Trupti Sawant inaugurates Pedestrian Flyover) करण्यात आलं.

वांद्रे पूर्वच्या तत्कालीन आमदार तृप्ती सावंत यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून यासंदर्भात मागणी केली होती. भुयारामध्ये पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे पश्चिम दृतगती महामार्ग ओलांडण्यास अडचणी येतात. पादचारी उड्डाणपूल बांधल्यास रस्ता ओलांडणे, सोपे जाईल अशी मागणी करण्यात आली होती. टीचर्स कॉलनीच्या आधी कार्डिनल ग्रेशेस शाळेजवळ हा पादचारी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

साहेब, जय महाराष्ट्र! संजय राऊत यांचा अजित पवारांना मेसेज

तृप्ती सावंत यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने निधी सुपूर्द केला आहे. परंतु काही जण आयत्या बिळावर नागोबा होण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु दुसऱ्याच्या मेहनतीचे श्रेय घेणाऱ्यांना पुन्हा तेच भोगावे लागेल, अशा शब्दात तृप्ती सावंत यांच्या समर्थकांनी नाव न घेता शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना इशारा (Trupti Sawant inaugurates Pedestrian Flyover) दिला.

वांद्रे पूर्व मतदारसंघाची पार्श्वभूमी

2015 मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळा सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना हरवून जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.

यंदाच्या तिकीटवाटपावेळी शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ‘वांद्रे पूर्व’ मतदारसंघात तिढा निर्माण झाला होता. अखेर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या गळ्यात टाकली गेली. त्यामुळे नाराज झालेल्या तृप्ती सावंत यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं.

बाळा सावंत घरचा माणूस, भावनिक नातं तोडू नका, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतरही तृप्ती सावंत बंडखोरीवर ठाम

राज्याच्या विविध भागातील बंडोबांना थंड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या अंगणातील बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरले होते. बाळा सावंत यांच्याशी असलेल्या घरच्या संबंधांची आठवण करुन देऊनही तृप्ती सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नव्हता

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.