दिल्लीला रवाना होण्यापूर्वी उदयनराजेंचं ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत उदयनराजेंचा प्रवेश (Udayanraje Bhosale Joining BJP) होणार आहे. भाजप प्रवेशासाठी नुकतंच पुणे विमानतळावरुन दिल्लीसाठी रवाना झालेत.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale Joining BJP) हे उद्या शनिवारी (14 सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत उदयनराजेंचा प्रवेश (Udayanraje Bhosale Joining BJP) होणार आहे. भाजप प्रवेशासाठी नुकतंच पुणे विमानतळावरुन दिल्लीसाठी रवाना झालेत. मात्र यापूर्वी उदयनराजेंनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे.
“वारसा जिजाऊ शिवबाचा, धमन्यांत उसळते रक्त, एक दिलाने आता लढाई रयतेच्या विकासासाठी फक्त”, अशा आशयाचा एक फोटो उदयनराजेंच्या अधिकृत ट्विटरद्वारे पोस्ट करण्यात आला आहे. यात नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील यांचे फोटो दिसत आहे. तसेच उद्या 14 सप्टेंबरला दिग्गजांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश (Udayanraje Bhosale Joining BJP) असेही यात म्हटलं आहे.
आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली, अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @AmitShah @nitin_gadkari @Dev_Fadnavis pic.twitter.com/Xpq6zgsYAq
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019
दरम्यान काही तासांपूर्वी ट्विटद्वारे उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना भाजप जाणार असल्याची माहिती दिली होती. “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे, आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”, असे ट्वीट त्यांनी केले होते. त्यानंतर 8 तासांनी उदयनराजेंनी नवं ट्विट केले आहे.
आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019
उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
पुणे विमानतळ येथून दिल्ली ला रवाना. यावेळी सोबत मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन.@Dev_Fadnavis pic.twitter.com/2uGrRD7v0l
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 13, 2019
दरम्यान भाजप प्रवेशापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे उदयनराजे खासदारकीचा राजीनामा सादर करणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजेंचा भाजप प्रवेश होणार आहे.