काँग्रेस हे भुरटे चोर, भाजपवाले डाकू आहेत : प्रकाश आंबेडकर

"काँग्रेस म्हणजे भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहे", अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash aambedkar Chandrapur) यांनी केली.

काँग्रेस हे भुरटे चोर, भाजपवाले डाकू आहेत : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Oct 11, 2019 | 6:33 PM

चंद्रपूर : “काँग्रेस म्हणजे भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहे”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash aambedkar Chandrapur) यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूरमधील बल्लारपुरात आयोजित केलेल्या जाहीर सभेत हे (Prakash aambedkar Chandrapur) वक्तव्य केले. “आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी चर्चेची वाट बघत होते,” असा धक्कादायक खुलासाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांनी चंद्रपुरात सभेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भाषणातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडी युतीवर सडकून टीका केली.

“मुख्यमंत्री स्वत: घाबरलेले आहेत. त्यांनी वंचित आघाडी विरोधी पक्ष असेल असे भाकीत केलं होते. पण यावेळी आम्ही सत्तेत बसू आणि भाजप हा विरोधी पक्ष म्हणून काम करेल” असा घणाघातही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तसेच बँकांच्या घोटाळ्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “बँका कोणी चोरल्या, कोणी लुटल्या असा प्रश्न त्यांनी उपस्थिती लोकांना विचारला. त्यावेळी अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. यानंतर आंबेडकरांनी ते कोणत्या राज्याचे आहेत असे विचारले असता, गुजरात असे उपस्थिती लोकांनी उत्तर दिले. यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लुटणारे हे सर्व गुजराती आहे आणि हे राज्यही गुजराती चालवत आहे. मग जर तुम्हाला तुमच्या बँकेतील पैसे सुरक्षित हवे असतील, तर भाजपला सत्तेवरुन घालवा” असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान ही सभा संपल्यानंतर त्यांनी निवडणुकीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. या आवाहनानंतर जनतेने दानपेटीत आर्थिक मदत केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.