मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना होती तो दिवस अखेर आज उजाडला आहे. नववर्षाचे मुहूर्त साधत शनिवारी (PM Kisan Samman Yojana) पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे. गतवर्षी 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा झाला होता. आतापर्यंत केवळ तर्क-वितर्क मांडले जात होते पण आज हा 10 हप्ताही खात्यावर जमा होणार आहे तर ही प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. यापूर्वी त्यांनी सेंद्रिय शेतीचा मंत्र दिला होता आज शेतकऱ्यांना नववर्षाचा काय संदेश देणार हे पहावे लागणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात असून देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. मध्यंतरी यामध्ये अनियमितता आढळून आल्याने कर भरुनही लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 1 कोटी 5 लाख शेतकऱ्यांना या निधीचा लाभ होणार आहे. त्याअनुशंगाने 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितलेले आहे. तर दुसरीकडे या हप्त्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी न करता कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. यासाठी बॅंकामध्ये गर्दी करु नये असेही आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
मध्यंतरी गुजरात येथे पार पडलेल्या सेंद्रिय शेती कार्यक्रमादरम्यानही पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी निमित्त होते ते सेंद्रिय शेती क्षेत्र वाढवण्याचे. यादरम्यान 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांचे मार्गदर्शन पाहिले असल्याचे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. आज शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मान निधी तर जमा होणारच आहे पण त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. आता गावपातळीवरील शेतकऱ्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठी http://pmindiawebcast.nic.in/ ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सन्मान निधी खात्यावर जमा होण्यास दोन दिवसांचा कालावधी असताना अनेकांना प्रश्न आहे की, eKYC ही प्रक्रिया केल्यावरच हा निधी जमा होणार का? न केल्यावर काय होणार. पण घाबरुन जाण्याचे कारण नाही. eKYC न केल्यासही हप्ता मिळणार आहे. मात्र, मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवायचे असतील तर मार्च 2022 पर्यंत ekyc करणे गरजेचे आहे. याकरिता केवळ 15 रुपये आकारले जाणार आहेत. त्यामुळे 10 वा हप्ता मिळण्यासाठी नाही पण भविष्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.