PM KISAN : 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर, अशी करा आपल्या नावाची तपासणी !

देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र, असे असले तरी अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम खात्यावर जमा होणार की नाही याबाबत संभ्रमता कायम आहे. कारण योजनेमध्ये नियमितता आणण्यासाठी मध्यंतरी अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, असे असले तरी शेकऱ्यांना ही रक्कम जमा झाली की नाही याची माहिती एका क्लिकवर होणार आहे.

PM KISAN : 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर, अशी करा आपल्या नावाची तपासणी !
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 5:32 PM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (PM Kisan Samman Yojana) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र, असे असले तरी अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम खात्यावर जमा होणार की नाही याबाबत संभ्रमता कायम आहे. कारण योजनेमध्ये नियमितता आणण्यासाठी मध्यंतरी अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, असे असले तरी (Farmer) शेकऱ्यांना ही रक्कम जमा झाली की नाही याची माहिती एका क्लिकवर होणार आहे. यामध्ये जर ऑनलाईन नोंदणी केली नसेल तर शेतकऱ्यांना त्वरीत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, 10 हप्ता आता जमा करण्यात आला असून यादीत नाव तपासणी करणे आवश्यक आहे.

योजनेच्या यादीमध्ये असे नाव तपासा

किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर आता तुम्ही तुमचे नाव पीएम-किसान योजना लाभार्थी यादीमध्ये ऑनलाइन पाहू शकता. तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड लागणार आहे. सर्वप्रथम पात्र शेतकऱ्यांना PM KISAN पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. https://pmkisan.gov.in/. त्यानंतर मुख्य मेनूतील ‘Farmers Corner’’ पर्याय निवडा लागणार आहे. आता तुम्हाला खालील पर्याय समोर राहणार आहेत. यामध्ये -New Farmer Registration -Edit Aadhar Failure Record -Beneficiary Status -Beneficiary List -Status of Self Registered/CSC Farmer -Download PM-Kisan Mobile App या पर्यायांमधून Beneficiary List पर्यायात क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची संबंधित राज्य, जिल्हा, तहसील, महसूल मंडळ आणि तुमचे गाव निवडावे लागेल. शेवटी ‘Get Report’ बटणात क्लिक करून आपल्या क्षेत्राच्या किसान सन्मान निधी योजना यादीमध्ये (PM KISAN YOJANA)या यादीमध्ये आपले नाव शोधावे लागणार आहे. यादीत तुमचे नाव समाविष्ट झाले तर या योजनेअंतर्गत तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळेल.

यादीत नाव नसेल तर काय?

ही रक्कम केवळ पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिली जाते. जर तुमचा अर्ज अद्याप झाला नसेल, तर योजनेच्या https://www.pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे.

अर्ज नोंदणीसाठी अटी-नियम

देशातील लहान आणि सीमांत शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याकरिता केवळ 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असावी लागते. लाभार्थी शेतकऱ्याकडे शेतजमिनीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये ओळखपत्र पुरावा म्हणून आधार कार्ड, बँक खाते पासबुक सारखी महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे जे त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेले पाहिजे.

पंतप्रधान-किसान नोंदणी

अर्जदार शेतकऱ्याची या योजनेअंतर्गत दोन प्रकारे नोंदणी केली जाऊ शकते: ऑनलाइन किंवा ऑफलाइन. ऑफलाइन अर्जासाठी शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जावे लागणार आहे. त्यावर आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करून या योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागते. ऑनलाइन अर्जासाठी पात्र शेतकरी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘नवीन शेतकरी नोंदणी’ करावी लागेल. ऑनलाइन अर्ज करताना, आपल्याला आपली कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील याची खात्री करा. अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेवर अर्ज करू शकता.

संबंधित बातम्या :

PM Kisan : कशामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!

FPO : पंतप्रधान मोदींनीच सांगितले शेतकरी उत्पादक कंपनीचे 5 बलस्थाने, वाचा सविस्तर

एरंडोल बाजार समितीच्या एका निर्णय अन् शेतकऱ्यांच्या दोन शेती पिकांचा फायदा, वाचा सविसतर

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.