अवकाळीने सर्वकाही हिरावले, राज्यात द्राक्ष बागायतदारांचे 10 हजार कोटींचे नुकसान

अतिवृष्टीचा परिणाम आजही खरीप हंगामातील कापूस आणि तूर या पिकावर दिसत आहे. तर आता अवकाळीने फळबागांचे झालेले नुकसान न भरुन निघण्यासारखे आहे. कारण या पावसामुळे राज्यातील द्राक्षबागांचे 10 हजार कोटींचे नुकसान झालेले आहे. काढणीला आलेल्या जवळपास 50 टक्के बागा ह्या वातावरणामुळे बाधित झालेल्या आहेत.

अवकाळीने सर्वकाही हिरावले, राज्यात द्राक्ष बागायतदारांचे 10 हजार कोटींचे नुकसान
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 12:36 PM

सांगली : अतिवृष्टीचा परिणाम आजही खरीप हंगामातील कापूस आणि तूर या पिकावर दिसत आहे. तर आता (Untimely rains) अवकाळीने फळबागांचे झालेले नुकसान न भरुन निघण्यासारखे आहे. कारण या पावसामुळे राज्यातील (damage to vineyards) द्राक्षबागांचे 10 हजार कोटींचे नुकसान झालेले आहे. काढणीला आलेल्या जवळपास 50 टक्के बागा ह्या वातावरणामुळे बाधित झालेल्या आहेत. आता उत्पन्न पदरात पडणार तेवढ्यात अवकाळीची अवकृपा झाली आणि निम्म्यापेक्षा अधिक बागा ह्या बाधित झाल्याचा अंदाज राज्य द्राक्ष बागायदार संघाने व्यक्त केला आहे. ऐन महत्वाच्या टप्प्यावर बागा असतानाच हा प्रकार घडल्याने फळबागायतदार अडचणीत आले आहेत.

काढणीला आलेल्या बागांचे असे झाले नुकसान

द्राक्षबागा ह्या आता अंतिम टप्प्यात होत्या. अनेक भागांमध्ये फळछाटणी झाली असल्याने बागा ह्या फुलोरावस्थेत आहेत. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून पाऊस व वातावरणातील बदलामुळे फुलोरावस्थेत असलेल्या बागांचे नुकसान झाले आहे. यामुळे फूलगळ, फळकूज या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर डाऊनी आणि भुरी रोगाचाही मोठा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. शिवाय वातावरणात बदल होत नसल्याने हा धोका अधिकच वाढणार की काय अशी स्थिती सध्या आहे. पण फळबागा कितीही जोपासल्या तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे.

राज्यात 4 लाख एकरावर द्राक्ष बागा

काळाच्या ओघात अधिकच्या उत्पादनाच्या दृष्टीने शेतकरी आता फळबागांकडे लक्ष केंद्रीत करीक आहे. त्यामुळे मर्यादित भागात घेतले जाणारे द्राक्षाचे उत्पादन आता राज्यभर घेतले जात आहे. यामध्ये एकरी सरासरी 12 टन उत्पादन मिळते तर प्रति किलो 40 रुपये दर मिळाला तरी एकरी 5 लाखाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडते पण निसर्गाच्या लहरीपणामुळे हे सर्व कागदालवरचे हिशोब असून प्रत्यक्ष बांधावरची स्थिती ही वेगळीच आहे. अतिपावसाने बागाही पडल्या आहेत. त्यामुळे बागा पुन्हा उभा करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा असा प्रश्न पडला आहे. दरवर्षी 4 लाख हेक्टरावरील बागांच्या माध्यमातून 20 हजार कोटींची उलाढाल होत असते पण यंदा ही उलाढाल निम्यावर आली असून आता दराचे काय होणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

शेतकऱ्यांसमोर एक ना अनेक प्रश्न

आठ दिवसातील वातावरणाचा परिणाम हा शेतकऱ्यांना वर्षभर उभदार येऊ देत नाही. कारण द्राक्ष लागवडीपासून ते तोडणीपर्यंत एकरी लाखो रुपये खर्च आहे. याकरिता शेतकरी हातउसणे वेळप्रसंगी बॅंकेचे कर्ज काढून जोपासना करतो. पण या बदल्यात आता तोडणीच्या प्रसंगीच ओढावलेल्या संकटामुळे द्राक्ष बागायतदार उध्वस्त झाला आहे. शिवया अजूनही वातावरणामुळे चिंतेचे ढग हे कायम आहेत. त्यामुळे शासनाने वीजबिल माफ करावे, कर्जाचे धोरण बदलावे, कर्ज वसुली थांबवून कर्ज थकले असले तरी शेतकऱ्यांना पुन्हा उभा राहण्यासाठी कर्ज दिले पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे.

संबंधित बातम्या :

पावसाने हंगामाच बदलला, आंब्याला मोहोर बहरण्याऐवजी फुटतेय पालवी

अशी ही माणुसकी, जे सरकार करु शकले नाही ते साखर कारखानदाराने करुन दाखविले..!

Smart Farmer: नांदेडच्या शेतकऱ्यांना कळाले योजनेचे महत्व, एका महिन्यात कोट्यावधींचा विजबिल भरणा, जाणून घ्या काय आहे योजना?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.