शेतकऱ्यांसाठी खुशखबर : प्रतिक्षा संपली यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या, सन्मान निधी योजनेतील 10 हप्त्याची

शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या योजनेचा आता 10 वा हप्ता काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान हा 10 हप्ता लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तत्पूर्वी या योजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : प्रतिक्षा संपली यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या, सन्मान निधी योजनेतील 10 हप्त्याची
Farmer
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 1:01 PM

मुंबई : शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या (Kisan Sanman Yojana) किसान सन्मान योजनेचा आता 10 वा हप्ता काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान हा 10 हप्ता लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तत्पूर्वी या योजनेअंतर्गत ज्यांना लाभ मिळणार आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रसिध्द करण्यात आलेल्या (List of Farmers) यादीत आपले नाव आहे का नाही याची तपासणी आता करता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून 10 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या अनुशंगाने यंत्रणा कामाला लागली आहे. आता अवघ्या काही दिवसांमध्ये ही 10 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यादीमध्ये असे शोधा आपले नाव

1. सुरवातीला पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या https://pmkisan.gov.in/.या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या उजव्या बाजूला Formers Corner या नावाचा पर्याय समोर असणार आहे. 2. यामध्ये Beneficiary List म्हणजेच लाभार्थ्यांची यादी असणार आहे. 3. लाभार्थी यादीच्या पर्यायावर येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. 4. नवीन पानावर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, बॅंक आणि गावाची माहिती भरावी लागणार आहे. अन्यथा केवळ आधार कार्ड, किंवा तुम्ही दिलेल्या बॅंकेचा खातेक्रमांक टाकला तरी सर्व तपशील समोर येणार आहे. 5. संपूर्ण यादीच नाही तर केवळ तुमचे नावच येणार असल्याने ही पध्दत सोपी आहे.

वर्षाकाठी 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर

अल्पभुधारक तसेच मध्यम शेतकऱ्याचे हीत लक्षात घेऊन ही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. 4 महिन्याला 2 हजार याप्रमाणे वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये जमा होतात. यापुर्वी मोदी सरकारने 9 हप्ते जमा केलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून 10 व्या हप्त्याची चर्चा ही सुरु आहे. कारण गतवर्षीही डिसेंबर महिन्यातच वर्षातला शेवटचा हप्ता जमा झाला होता. त्यामुळे यावेळीही 15 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान ही रक्कम जमा होणार आहे.

आतापर्यंत 11 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गरजू शेतकऱ्यांना होत आहे. आतापर्यंत देशातील 11 कोटी 37 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. गतवर्षीही 25 डिसेंबर रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा झाली होती. त्यामुळे यंदाही नेमक्या कोणत्या दिवशी रक्कम अदा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता या संदर्भातले काम अंतिम टप्प्यात आहे. दहाव्या हप्त्यासाठी लाभार्थी शेतकरी यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

द्राक्षाचे नुकसान प्रशासकीय यंत्रणेमुळेच, आस्मानी संकटाला प्रशासनाकडून ‘पाठबळच’

कृषी विभागाचे सर्वकाही ऑनलाईनच, कृषी सेवा केंद्रांच्या कारभारातही काय झाला मोठा बदल?

अतिवृष्टीचे अनुदान बॅंकेत, आता वितरणापूर्वी शेतकऱ्यांना ‘एटीएम’ कार्डचे होणार वाटप

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.