नुकसान होऊनही हेक्टरी 12 क्विंटल सोयाबीन, पीक कापणीचा अहवाल सादर आता मदतीचे काय?
पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी ज्या पिकांचा पंचनामा हा पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे करण्यात आलेला नाही त्या पिकांचा पंचनामा आता पिक कापणीनंतर केला जातो. अखेर खरीप हंगमातील पिकांची कापणी झाली असून लातूरसह उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील पिकांची उत्पाकता समोर आली आहे. तर या विभागातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अहवाल अद्यापही समोर आलेला नाही.
लातूर : पावसामुळे (Kharif Season) खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी ज्या पिकांचा पंचनामा हा पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे करण्यात आलेला नाही त्या पिकांचा पंचनामा आता पिक कापणीनंतर केला जातो. अखेर खरीप हंगमातील ( Crop Harvesting Report) पिकांची कापणी झाली असून लातूरसह उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यातील पिकांची उत्पाकता समोर आली आहे. तर या विभागातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अहवाल अद्यापही समोर आलेला नाही. मात्र, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असले तरी (Latur Division) लातूर जिल्ह्यात सोयाबीनची कापणी नंतरची उत्पादकता ही हेक्टरी 12 क्विंटल 35 किलो एवढी आहे. त्यामुळे आता मदतीचे काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.
कापणी प्रयोगाअंती कशी मिळते मदत
आता पर्यंत पिक पंचनामे झालेल्या क्षेत्रावरील नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे किंवा त्याची प्रक्रिया ही सुरु आहे. मात्र, ज्या ठिकाणचे पंचनामे झाले नव्हते त्या क्षेत्रावरील पीक कापणीनंतरची उत्पादकता ही ग्राह्य धरली जाते. आता लातूर विभागीय कार्यालयाच्यावतीने हे पीककापणी प्रयोग सुरु आहेत. यामध्ये उस्मानाबाद, हिंगोली आणि लातूरचे अहवाल हे कृषी सहसंचालक कार्यालयाकडे जमा झाले आहेत.
*आता हे अहवाल पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येतात. कृषी आयुक्त कार्यालयात याची नोंद होऊन परत पीक उत्पादनाचे अहवाल हे संबंधित कार्यक्षेत्रात असलेल्या कंपनीकडे सपूर्द केले जातात.
* पीक विमा कंपनीकडून गेल्या पाच वर्षातील उत्पादकता ही तपासली जाते. गेल्या पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन कमी असेल तरच नुकसानभरपाई दिली जाते. अन्यथा नुकसान झाले असे ग्राह्यच धरले जात नाही. त्यामुळे आता कृषी सहसंचालक कार्यालयाकडे हे अहवाल तर जमा झाले आहेत. उर्वरीत दोन जिल्ह्याचे अहवाल जमा झाले की कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यानुसार कशी आहे उत्पादकता
पीक कापणीअंती लातूर जिल्ह्यात सोयाबीन हेक्टरी 12 क्विंटल 35 किलो असे उत्पादन मिळाले आहे तर मूग हेक्टरी 6 क्विंटल 33किलो व उडीद 6 क्विंटल 98 किलो पिकला असल्याची माहिती देण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन हेक्टरी 10 क्विंटल 60 किलो तर मूग 7 क्विंटल 50 किलो तर उडीद 7 क्विंटल 50 किलो हेक्टरी पिकला आहे. नांदेड आणि हिंगोली येथील सोयाबीनची उत्पादकता अद्यापही स्पष्ट झालेली नाही.
आता मदतीचे काय?
5 वर्षातील उत्पादनाच्या सरासरीनुसार शेतकऱ्यांना आता ही मदत दिली जाते. मात्र, नुकसानीनंतरही एकरी 5 क्विंटलचा उतार असेल तर सोयाबीनचे नुकसान कसे म्हणता येईल हा प्रश्न आहे. मात्र, गेल्या पाच वर्षातील उत्पादन हे अधिक वाढीव असले तरच यंदाच्या उत्पादकतेनुसार मदत मिळणार आहे. एकतर शेतकऱ्यांना मदतीबाबत विमा कंपन्या ह्या उदासिन आहेत. त्यामध्येच उत्पादकता वाढली असेल तर मदतीची आशा धुसरच म्हणावे लागेल.