प्रक्रियेतच अडकली 5 लाख शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम, नेमकी काय आहे अडचण?
अतिवृष्टीने मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीपोटी राज्य सरकारकडून मदतही जाहीर झाली आहे. मात्र, दिवाळीपूर्वी मिळणारी मदत अद्यापही प्रक्रियेतच अडकली आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही प्रक्रिया सुरु असूनही मराठवाडा विभागातील तब्बल 5 लाख 82 हजार शेतकरी अद्यापही मदतीच्याच प्रतिक्षेत आहेत.
लातूर : अतिवृष्टीने मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. (Compensation,) नुकसानीपोटी (State Government) राज्य सरकारकडून मदतही जाहीर झाली आहे. मात्र, दिवाळीपूर्वी मिळणारी मदत अद्यापही प्रक्रियेतच अडकली आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही प्रक्रिया सुरु असूनही मराठवाडा विभागातील तब्बल 5 लाख 82 हजार शेतकरी अद्यापही मदतीच्याच प्रतिक्षेत आहेत. तर 41 लाख 91 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई मिळालेली आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला होता पण प्रत्यक्षाच अणखिन 8 दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 36 लाख 52 हजार हेक्टरावरील खरीप पिकांसह फळबागांचे नुकसान झाले होते. मराठवाडा विभागातील 47 लाख 74 हजारहून अधिक शेतकरी हे अतिवृष्टीने बाधित झाले होते. सरकारने जाहीर केल्यानुसार पहिल्या टप्प्यात 2 हजार 551 कोटींचे वाटप झाले आहे. 90 टक्यांपर्यंतचे अनुदान हे बॅंकेत जमा करण्यात आले आहे. असे असले तरी विभागातील 5 लाख 82 हजार शेतकरी हे मदतीच्या प्रतिक्षेतच आहेत
सर्वाधिक लाभ बीड जिल्ह्याला
बीड जिल्ह्यातील 8 लाख 48 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. त्याअनुशंगाने 502 कोटी 37 लाख रुपयांचे अनुदान जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. यामधील 480 कोटी 5 लाखाचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे बीडला सर्वाधिक अनुदान तर मिळाले आहेच पण त्याचे वाटपही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिकचे आहे.
राज्य सरकारने मदतनिधी जमा केला म्हणजे काय?
राज्य सरकारने मदतीची घोषणा करीत असले तरी यामागे मोठी प्रक्रिया असल्याने सरकारने जाहीर केलेली मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर येण्यास किमान चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. नुकसानभरपाईची मदत जाहीर होते म्हणजे राज्य सरकार हे त्यांच्या मुख्य बॅंकेत मदतीचे पैसे वर्ग करते. त्यानंतर त्या मुख्य बॅंकेतून राज्यातील शेतकऱ्यांची ज्या बॅंकेत खाती आहेत त्या बॅंकेमध्ये ठरवून दिल्यानुसार रक्कम अदा केली जाते. मात्र, हे करताना शेतकऱ्यांची यादी, खाते क्रमांक, नाव, बॅंकेचे नाव, रक्कम याची तपासणी करावी लागते. त्यामुळे सरकारने रक्कम जाहीर केली, नुकसानीची रक्कम अदा केली तरी त्यानंतरच्या प्रक्रियेला किमान चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. म्हणूनच घोषणा करुन चार दिवस उलटले तरी प्रत्यक्षात अद्यापही मदतनिधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही.
‘बॅच पोस्टींग’ प्रक्रिया म्हणजे काय?
सरकारची जी बॅंक आहे त्या बॅंकेतील ही नुकसानभरपाईची मदतनिधी आहे तो शेतकऱ्यांची खाते असलेल्या सर्व बॅंकेत वर्ग करणे म्हणजेच बॅंक पोस्टींग होय. या दरम्यान, सराकरकडून संबंधित बॅंकेकडे रक्कम आणि शेतकऱ्यांची यादी ही सपूर्द केली जाते. त्यानंतर शेतकऱ्याची सर्व माहिती ही बरोबर आहे का नाही हे तपासून त्या-त्या बॅंकेत शेतकऱ्यांची एक संख्या ठरवून हे पैसे जमा केले जातात. यामध्ये काही चुकीचे झाले तर पैसे वर्ग होत नाहीत. जोपर्यत काय चुकले आहे याचा शोध लागत नाही तोपर्यंत पैसे हे वर्ग होत नाहीत. या तपासणीला आणि पैसे जमा करण्यास तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या पदरी पडण्यास विलंब होत आहे.
संबंधित बातम्या :
कापूस पिकाचे फरदड शेतकऱ्यांच्या नुकसानीचे की फायद्याचे ?