मध केंद्रासाठी 50 टक्के अनुदान, खादी व ग्राम उद्योग केंद्राकडून अनुदनासह मिळणार प्रशिक्षण

मध उद्योग वाढविणे आणि तरुण शेतकऱ्यांना प्रोहत्साहन देण्यासाठी राज्य सरकार स्थरावर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून केवळ अनुदानच नाहीतर योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

मध केंद्रासाठी 50 टक्के अनुदान, खादी व ग्राम उद्योग केंद्राकडून अनुदनासह मिळणार प्रशिक्षण
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 6:57 PM

लातुर : मध उद्योग वाढविणे आणि तरुण शेतकऱ्यांना प्रोहत्साहन देण्यासाठी राज्य सरकार स्थरावर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून केवळ अनुदानच नाहीतर योग्य ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून मोफत प्रशिक्षण, साहित्यासाठी 50 टक्के अनुदान हे गुंतवणुकीनुसार दिले जाणार आहे. यातून शासनाच्या हमी भावाने मध खरेदी छंद प्रशिक्षणाची सुविधा तसेच मधमाशांचे संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे.

मधमाशांचे संरक्षण आणि तरुण शेतकऱ्यांना उद्योग मिळावा या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. याकरिती अर्जदारास 24 हजार रुपये भरल्यास 24 हजाराचे साहित्य दिले जाणार आहे. याकरिता अर्जदार हा साक्षर असून त्याचे वय हे 18 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. याकरिता 10 दिवसाचे प्रशिक्षण हे गरजेचे आहे. प्रगतशील मधपाळ याकरिता वयोमर्यादा ही 21 वर्ष असणार आहे. शिवाय अर्जदार हा 10 वी उत्तीर्ण असून त्याच्या नावे एक एक्कर शेत जमिन किंवा त्याने भाडेतत्वावर जमिन घेतलेली असावी. मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत मार्गदर्शन देण्याची त्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

केंद्र चालक संस्थेसाठी संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर 1 हजार चौरस फुटाची इमारत गरजेची आहे. शिवाय या संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व उत्पादन बाबत नागरिकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

असा घेता येणार प्रवेश

विशेष छंद घटकाअंतर्गत 25 रुपये प्रवेश शुल्क अदा करणे आवश्यक आहे. शाळा, कॅालेडमधील विद्यार्थी, तसेच नागरिक किंवा ज्येष्ट नागरिक यांना देखील 5 दिवसाचे प्रशिक्षण हे घेणे बंधनकारक राहणार आहे. आग्या मध संकलन प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा साक्षर असणे आवश्यक आहे. शिवाय 18 ते 50 वयोगटातील नागरिकालाच यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याकरिता किमान 5 दिवसाचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. ही सर्व निवड ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे सर्व असले तरी प्रशिक्षण घेण्यापुर्वी लाभार्थ्यास मध व्यवसाय सुरु करणार अशा मूकराचे पत्र देणे बंधनकारक राहणार आहे.

काय आहे उद्देश

आजही तरुण शेतकरी हे पारंपारिक शेतीकडेच वळलेला आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळाच्या माध्यमातून मध व्यवसायाबाबत योग्य ते प्रशिक्षण देऊन एक वेगळा व्यवसाय तरुण शेतकऱ्यांना सुरु करता यावा हा त्याचा उद्देश आहे. याकरिता केवळ अनुदानच नाही तर प्रशिक्षणही दिले जाणार आहे. याकरिता अधिक माहितीसाठी मध संचालनालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महाबळेश्वर येथे संपर्क साधता येणार आहे. याकरिता 02168- 260 264 हा क्रमांकही देण्यात आला आहे. (50% grant for honey centre, training with grants from Khadi and Gram Udyog Kendras)

इतर बातम्या :

केंद्र सरकारचा दिलासा : दाळीचे दर राहणार मर्यादीत, सणाच्या तोंडावर मोठा निर्णय

पांढर ‘सोनं’ही चिखलात, पावसामुळे शेती कामे रखडलेलीच

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी : सोयबीनच्या दरात झपाट्याने घसरण, शेतकऱ्यांचे लक्ष लातुरच्या बाजारकडे

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.