यंदाच्या नुकसान भरपाईचं सोडाच, दोन वर्षापासून आठशे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 800 शेतकरी हो गेल्या दोन वर्षापासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एवढेच नाही तर प्रशासनाकडून दोनवेळा पंचनामे होऊनही पंढरपूर आणि माढा तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
सोलापूर : सध्या शेतकऱ्यांची एकच गडबड आहे ती म्हणजे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात तक्रार नोंदवण्याची. याकरिता शेतकरी (Farmer) ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीचा अवलंब करीत आहे. (Online) पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात हेच चित्र आहे. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 800 शेतकरी हो गेल्या दोन वर्षापासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. एवढेच नाही तर प्रशासनाकडून दोनवेळा पंचनामे होऊनही पंढरपूर आणि माढा तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.
अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षापुर्वी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि माढा तालुक्यातही अतिवृष्टीने खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आणि इतर अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. मात्र, यामधून तब्बल 800 शेतकरी हे वगळले गेले. इतर शेतकऱ्यांना मदत मिळाली हे 800 शेतकरी मदतीपासून दूर कसे असा सवाल उपस्थित झाला. दरम्यान, या 800 शेतकऱ्यांची नावेच यादीतून वगळली गेल्याची बाब समोर आली होती. यानंतर येथील लोकप्रतिनीधी यांच्या मागणीनुसार अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे दोनदा पंचनामे करण्यात आले होते.
या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक होते. परंतू, अजूनही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही. आता संबंधित तहसीलदार आणि तलाठी यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत केव्हा मिळणार हा प्रश्न कायम आहे. यामध्ये एकूण 812 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांची धडपड, प्रशासन मात्र सुस्तच
खरिपातील उत्पादनातून नाही तर किमान नुकसान भरपाईच्या निधीतून तरी दिलासा मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईनद्वारे तक्रार नोंदवलेली नाही. तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया ही किचकट असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत तर कृषी विभाग आणि महसूलच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.
मनुष्यबळ नसल्यानेच शेतकऱ्यांचा ‘बळी’
पिक रक्कम कंपनीला जमा झाली की शेतकऱ्यांकडे ना कृषी विभागाचे लक्ष राहते ना विमा कंपनीचे. अतिवृष्टीमुळे सर्रास शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे किंवा पिकांची पाहणी करण्यासाठी कंपनीकडे मनुष्यबळ नाही. आता नु्कसानीनंतर हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली असावी. त्यामुळे अधिकतर हे अॅप कार्यरत होत नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे तर हे अशा प्रकारचे अॅपच नसल्याने अडचणी वाढत आहेत.
यंदाही 34 गावांमध्ये नुकसान
सोलापूर जिल्ह्यातील 34 गावांमध्य़े यंदाही पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान मोहोळ तालुक्यात झाले आहे. येथील 34 गावातील अडीच हजार हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले आहे. माढा तालुक्यातील 5 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा तरी अचूक पंचनामे करून मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत (800 farmers awaiting compensation for two years, picture of Solapur district)