Watermelon : हंगामाच्या सुरवातीला भाव खाणारे कलिंगड आता जनावरांच्या दावणीला, हंगामी पिकातूनही फटका

हंगामाच्या सरुवातीला किलोवर कलिंगड विकले जात होते. शिवाय मागणीही त्याच प्रमाणात होती. पण आवक वाढली आणि बाजारपेठेत आंबाही दाखल झाला. त्यामुळे कलिंगडच्या मागणीत मोठी घट झाली. शेतकऱ्यांना वाहतूकीवर खर्च करुन बाजारपेठ जवळ करणेही मुश्किल झाले. आता तर घटत्या दराबरोबर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कलिंगड दराचे भवितव्य काय याबाबत शंका उपस्थित होत आहे.

Watermelon : हंगामाच्या सुरवातीला भाव खाणारे कलिंगड आता जनावरांच्या दावणीला, हंगामी पिकातूनही फटका
कलिंगडच्या दरात घसरण झाल्यामुळे कलिंगड आता थेट जनावराच्या दावणीला दिसून येत आहेत.
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 4:08 PM

लासलगाव : यंदा कोरोनाच्या अनुशंगाने जे निर्बंध होते ते हटविण्यात आले होते. त्यामुळे (Watermelon) कलिंगड विक्रीला कोणतीच अडचण नव्हती शिवाय गेल्या दोन वर्षात बाजारपेठा बंद असल्याने जे नुकसान झाले होते ते भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांकडे होती. शिवाय (Summer Season) हंगामाची सुरवातही दणक्यात झाली होती. सुरवातीला 15 रुपये किलो असणारे (Watermelon Rate) कलिंगड आता 10 रुपयांना 4 अशा अवस्थेत आहे. त्यामुळे अधिकचे उत्पन्न सोडाच उत्पादनावर झालेला खर्चही यामधून निघालेला नाही. आतापर्यंत बाजारपेठा उपलब्ध नव्हत्या आता सर्वकाही खुले असतानाच कलिंगड किलोवर तर दूरच गनावरही कवडीमोल दरात विकले जाऊ लागले आहे. विक्रीसाठीचे कष्ट आणि बाजारपेठेत दाखल करण्यावर होणारा खर्च पाहता कलिंगड थेट जनावरांच्या दावणीला टाकण्याची वेळ आली आहे.त्यामुळे मुख्य पिकांबरोबर हंगामी पिकांनीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

महिला शेतकऱ्याने अथक पऱिश्रम करुनही निराशाच

पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्यांकडून केला जातो. त्याच अनुशांगाने येवल्यातील 36 चारी येथे सुस्मिता सोनवणे या महिला शेतकऱ्याने दीड एकर टरबुजाचे पीक घेतले होते मात्र पीक निघण्यास सुरुवात झाली असता बाजारात टरबूज विक्रीला आणले असता टरबुज 10 रुपयात चार टरबूज विकण्याची वेळ आली असल्याने अक्षरशः टरबूज जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. दीड एकर करता जवळपास 80 ते लाख रुपये उत्पादन खर्च आला होता मात्र उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने जनावरांना टरबूज खाऊ घालण्याची वेळ या शेतकरी महिलेवर आली आहे.

10 रुपयांना 4 कलिंगडे

हंगामाच्या सरुवातीला किलोवर कलिंगड विकले जात होते. शिवाय मागणीही त्याच प्रमाणात होती. पण आवक वाढली आणि बाजारपेठेत आंबाही दाखल झाला. त्यामुळे कलिंगडच्या मागणीत मोठी घट झाली. शेतकऱ्यांना वाहतूकीवर खर्च करुन बाजारपेठ जवळ करणेही मुश्किल झाले. आता तर घटत्या दराबरोबर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कलिंगड दराचे भवितव्य काय याबाबत शंका उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्य पिकानंतर हंगामीमधूनही नुकसानच

निसर्गाच्या लहरीपणामुळे दोन्ही हंगामातील मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर अधिकचा खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी सरळ कमी कालावधीत येणाऱ्या पिकांवर भर दिला. मात्र, दराची निश्चितता नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा, कलिंगड यासारख्या पिकांचे दर रात्रीतून बदलत असल्याने शेती कशी करावी हाच मोठा प्रश्न आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.