एरंडोल बाजार समितीच्या एका निर्णय अन् शेतकऱ्यांच्या दोन शेती पिकांचा फायदा, वाचा सविसतर
यांत्रिकिकरणाचा उपयोग, योग्य नियोजन यामधून शेती उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, वाढत्या उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे. कवडीमोल दरामध्ये शेतीमालाची विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येत आहे. शेतकऱ्यांच्य याच पडत्या बाजूंचा विचार करुन जिल्ह्यातील एरंडोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्वारी आणि मक्याला हमीभाव देण्याचा निर्णयच घेतला नाही तर तो अंमलातही आणला आहे.
नाशिक : यांत्रिकिकरणाचा उपयोग, योग्य नियोजन यामधून (Farm Production) शेती उत्पादनात वाढ होत आहे. मात्र, वाढत्या उत्पादनाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे. कवडीमोल दरामध्ये शेतीमालाची विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येत आहे. शेतकऱ्यांच्य याच पडत्या बाजूंचा विचार करुन जिल्ह्यातील एरंडोल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्वारी आणि मक्याला (Guarantee for agricultural produce) हमीभाव देण्याचा निर्णयच घेतला नाही तर तो अंमलातही आणला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हमीभावाचा मोठा आधार मिळत आहे. गेल्या 15 दिवसांपासून नोंदणी सुरु होती तर आता प्रत्यक्ष खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे.
ज्वारी, मक्याला असा आहे हमीभाव
ज्वारीच्या क्षेत्रात घट होत असली तरी नाशिक जिल्ह्यातील एरंडोल तालुका आणि परिसरात ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची एरंडोल येथे उपसमिती आहे. याच समितीमध्ये ज्वारीला 2 हजार 738 एवढा तर मकाला 1 हजार 870 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव देण्यात आला आहे. ज्वारी, मक्याच्या खरेदीला प्रत्.क्षात सुरवात झाली असून शेतकऱ्यांनी काळवंडलेला माल खरेदी केंद्रावर आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हमी भावासाठी शेतकरी संघाने पुढाकार घेतला असून आ. चिमराव पाटील यांनीही खरेदी केंद्र उभारण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार आहे.
ऑनलाईनच्या माध्यमातूनही करता येणार नोंदणी
शेतीमाल थेट खरेदी केंद्रावर न आणता शेतकऱ्यांना प्रथम त्याची नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून नोंदणी करताना शेतकऱ्यांना पिकपेरा, सातबारा, 8 अ, आधार कार्ड याची माहिती अदा करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन नोंदणी सुरु असल्याने मका मोजणीसाठी 407 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आता कुठे सुरवात झाली असून एरंडोल तसेच धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
एरंडोलसाठी स्वतंत्र बाजार समिती
सध्या येथील शेतीमालाची खरेदी-विक्री ही उपसमितीमध्ये होत आहे. मात्र, स्वतंत्र बाजार समिती उभारण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून होत आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणामुळे हे काम अर्धवट राहिले होते. पण एरंडोल तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती उभारली जाणार असून शेतकी संघाचीही स्थापना केली जाणार असल्याचे आ. चिमणराव पाटील यांनी सांगितले आहे.