Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा व्यापारी की कसाई?, दोन टन कांदे खरेदी केले, उलट शेतकऱ्याकडून पैसेही घेतले

मात्र शिंगारे यांनाच आपल्या जवळील 986 रुपये व्यापाऱ्याला देण्याची वेळ आली. शिंगारे यांच्या कांद्याला सोलापूरच्या मार्केटमध्ये प्रति किलो एक रुपया, दीड रुपया तर 50 पैसे असा दर मिळाला.

हा व्यापारी की कसाई?, दोन टन कांदे खरेदी केले, उलट शेतकऱ्याकडून पैसेही घेतले
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 3:52 PM

महेंद्रकुमार मुधोळकर, प्रतिनिधी, बीड : बीड तालुक्यातील अशोक शिंगारे यांनी दीड एकरवर कांद्याची लागवड केली होती. अवकाळी गारपीट अशा आसमानी संकटाचा सामना करून कांद्याचे पीक जोपासलं. यातून दोन टन कांद्याचं उत्पादन झालं. हा कांदा सोलापूरच्या मार्केटमध्ये नेण्यात आला. या मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला पैसे मिळणे अपेक्षित होतं. मात्र शिंगारे यांनाच आपल्या जवळील 986 रुपये व्यापाऱ्याला देण्याची वेळ आली. शिंगारे यांच्या कांद्याला सोलापूरच्या मार्केटमध्ये प्रति किलो एक रुपया, दीड रुपया तर 50 पैसे असा दर मिळाला.

यातून दोन टनाचे 2871 रुपये मिळाले. त्यातून व्यापाराचा खर्च म्हणून शेतकऱ्याला जवळचे 986 रुपये द्यावे लागले. मायबाप सरकारने आता कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.

onian 2 n

हे सुद्धा वाचा

सरकारने खरेदी करावा कांदा

सरकारनेच थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा. शेतकऱ्याला दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वेळीच विचार केला नाही तर मात्र रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेकापचे जिल्हाध्यक्ष मोहन गुंड यांनी दिला आहे.

कांदा उत्पादकाच्या डोळ्यात अश्रृ

पारंपरिक शेती सोडून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. मात्र बाजारात हा कांदा विक्रीसाठी नेला असता शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरंगत आहेत. मायबाप सरकारने वेळीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करणे गरजेचे झाले आहे.

दोन टन कांदे दिले, शिवाय पैसेही

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणलं आहे. बीड तालुक्यातील नागापूर येथील शेतकऱ्याला दोन टन कांदा विकून आपल्या जवळचेच 986 रुपये व्यापाऱ्याला देण्याची वेळ आली. त्यामुळे हा शेतकरी हतबल झालाय.

यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यामुळे कांद्याचे दर ठरवणे आवश्यक आहे. सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देणे गरजेचे आहे. अन्यथा खाण्यातील कांदा नाहीसा व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.