पीक नुकसानीच्या पूर्वसूचनांचा ‘ढीग’, सर्व्हेक्षणात तक्रारी अपात्र

राज्यातून जवळपास 28 लाख शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे केले आहेत. तर एकट्या परभणी जिल्ह्यात 4 हजार 743 पूर्वसूचना ह्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे पूर्वसूचना दाखल झाली की विमा रक्कम पदरात पडणार असे नाही.

पीक नुकसानीच्या पूर्वसूचनांचा 'ढीग', सर्व्हेक्षणात तक्रारी अपात्र
पावसाने खरीपातील पिकांची झालेली अवस्था
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 6:54 PM

लातूर : सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे यामुळे खरीपातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना (Crop Damaged) हा विमा कंपनीला दिलेली आहे. (Maharashtra) राज्यातून जवळपास 28 लाख शेतकऱ्यांनी नुकसानीचे दावे केले आहेत. तर एकट्या परभणी जिल्ह्यात 4 हजार 743 पूर्वसूचना ह्या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे पूर्वसूचना दाखल झाली की विमा रक्कम पदरात पडणार असे नाही. प्रत्यक्ष पाहणी दरम्यान विमा कंपनीचे प्रतिनिधी हे काय अहवाल देतात हे महत्वाचे आहे.

परभणी येथील पूर्वसूचना ह्या नुकसान आढळून न आल्याने अपात्र ठरिवण्यात आलेल्या आहेत. पूर्वसूचना दाखल होताच गेल्या 21 दिवसांपासून पीक पाहणी आणि पंचनामे हे कृषी अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनीधी हे करीत आहेत. एकीकडे मदतीची प्रक्रिया सुरु असली तरी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सुरुच आहे. पंचनाम्यानंतर पावसाने नुकसान झाले असेल तर त्या नुकसानीचे पंचनामे हे स्थानिक प्रशासन करणार आहे. त्यामुळे ही दिरंगाईची प्रक्रिया असून शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती मदतीची..

परभणीतून 2 लाख 68 हजार तक्रारी

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमाधारक शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमाभरपाईसाठी 2 लाख 68 हजार 404 पूर्वसूचना विमा कंपनीकडे विविध माध्यमांतून दाखल केल्या आहेत. नुकसान आढळून न आल्यामुळे 4 हजार 743 पूर्वसूचना अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. नुकसान आढळून न आल्याने अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही. केवळ ज्या शेतकऱ्यांचे 25 टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ मिळणार आहे. तर पंचनामे केल्यानंतर नुकसान झाले असेल तर त्याचे नुकसानभरपाई ही पीक कापणीनंतर मिळणार आहे.

तात्काळ मदतीचा पर्यायही समोर

नुकसानभरपाईसाठी राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निधीतून केंद्र सरकारने जर मंजूरी दिली तर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळू शकते. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावरील पिकासांठी हेक्टरी 6800 तर बागायतीला 13500, तर फळबागेसाठी 18 हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळू शकतात. यातही एक अट घालून देण्यात आली आहे की, ही रक्का एका खातेदाराला दोन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राकरिता मिळणार आहे. शिवाय केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार हे नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीतून लागलीच मदत करु शकते. याकरिता केंद्राच्या परवानगीची आवश्यकताही नाही. मदतीची रक्कमही ठरविण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे.

पंचनाम्यानंतर नुकसान झाल्यास पुढे काय?

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जर नैसर्गिक नुकसान झाले तर पुन्हा त्याचे पंचनामे होणार नाहीत. तर पूर, ढगफुटी किंवा अधिक काळ पाणी शेतामध्ये साचले तर ही ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती’ समजली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर अधिकारी- कर्मचारी हे पाहणी करतील पण प्रत्यक्षात मदत ही पीककापणी प्रयोगानंतर होणार आहे.

संबंधित बातम्या :

काय सांगता ? एकाच वनस्पतीतून टोमॅटो अन् वांग्याचे उत्पादन, दुहेरी फायदा

पावसात भिजलेल्या सोयाबीनची काढणी- मळणीच महत्वाची, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

मोहरीने मिळेल उभारी ; दरात 400 रुपयांची वाढ, लागवडीसाठीही पोषक वातावरण

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.