टोमॅटो महागल्याने चिंतेत असलेला अभिनेता सुनील शेट्टी याने हा फोटो बघितलाच नसेल का?

अभिनेता सुनील शेट्टी याने टोमॅटोच्या भाववाढीनंतर आपलं किचनचं बजेट कोलमडल्यासारखं आहे, मी अभिनेता असलो तरी माझ्यासाठी टोमॅटोचे भाव वाढणे हे कठीण झाले आहे, असं म्हटलं असलं, तरी नेटीझन्सने सुनील शेट्टीला शेतकऱ्याच्या या मुलीचा फोटो दाखवून सवाल केले आहेत.

टोमॅटो महागल्याने चिंतेत असलेला अभिनेता सुनील शेट्टी याने हा फोटो बघितलाच नसेल का?
ACTOR SUNIL SHETTY Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 9:45 PM

मुंबई : टॉमॅटो महागल्याने अभिनेता सुनील शेट्टी याने चिंता व्यक्त केली आहे, सुनील शेट्टी याने म्हटलं आहे की, टोमॅटोचे भाव वाढल्याने जरी तो अभिनेता असला, तरी त्याचं कीचन हे प्रभावित झालं आहे. सुनील शेट्टी याने ही पोस्ट सोशल मीडियावर लिहिताना टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा जराही विचार केलेला दिसत नाही. सुनील शेट्टी याने टोमॅटोच्या भाववाढीवर केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर त्याच्यावर सडकून टीका होत आहे.सुनील शेट्टी सारख्या अभिनेत्याला ज्याचे चित्रपटांचा बजेट हा करोडोवर होता आणि उत्पन्न देखील कोट्यवधींच्या घरात आहे. तरीही सुनील शेट्टी याला टोमॅटोच्या भाववाढीचा त्रास होत आहे, यावरुन सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि सुनील शेट्टी याची फिरकी देखील घेतली जात आहे.

सुनील शेट्टी याने या मुलीचा फोटो बघितलाच नसेल का?

सुनील शेट्टी याने टोमॅटोच्या भाववाढीवर पोस्ट करण्याच्या काही दिवसांआधी सोशल मीडियावर, शेतात शेतकऱ्याची लहान मुलगी शेतातच झोपलेली आहे आणि आईवडील शेतात काम करतायत. शेतात नेहमीच साप, विंचू यांचा धोका कायम असतो. जमिनीवर झोपलेल्या या मुलींला मुंग्या आणि मुंगळे देखील चावू शकतात, तरी देखील शेतकरी एवढा धोका पत्करुन आपल्या पोटच्या पोराबाळांना असं सोडून पिकवतात, हे सर्व दृश्य आणि हा फोटो कधी सुनील शेट्टी याने पाहिलाच नाही का? असा देखील सवाल उपस्थित होत आहे.

सुनील शेट्टी हा अभिनेता तसा कधीही वादग्रस्त न बोलणारा आणि वादात न येणारा अभिनेता आहे, तरी देखील सुनील शेट्टी याने अशी पोस्ट का केली, याची देखील चर्चा सोशल मीडियावर आहे. सरकारकडून दिवाळीला मिळणारा 100 रुपयाचा आनंदाचा शिधा, ज्यात तेल, साखर, रवा, डाळी मिळतात, त्याचा खरा लाभार्थी सुनील शेट्टी असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

हे सुद्धा वाचा

सुनील शेट्टी असं बोलून गेला पण

सुनील शेट्टी हा फक्त अभिनेताच नाही, तर एक उद्योजक देखील आहे. सुनील शेट्टी याने फूड डिलेव्हरी अॅप देखील काढलं आहे, म्हणून की काय सुनील शेट्टी याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मी आणि माझी बायको आम्ही ताज्या भाज्या आणि ताजी फळे खाण्यावर भर देतो. तसेच ही ताजी फळे, ताज्या भाज्या या अॅपवरच मिळतात आणि आम्ही तिथूनच खरेदी करतो.

चांगल्या मातीत हे उत्पन्न घेतलं जातं. कदाचित सुनील शेट्टी याला सेंद्रीय शेतीत पिकवलेली फळं आणि सेंद्रीय ताज्या भाज्यांबद्दल बोलायचं होतं की काय,असं देखील या पोस्टवरुन दिसून येतं. पण टोमॅटो पिकवण्यासाठी किंवा शेतीत पिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, तरी देखील अनेक वेळा हा शेतीमाल फेकून दिला तर परवडतो, पण विकायला परवडत नाही अशी स्थिती असते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.