यंदा रब्बी हंगाम लांबणीवर, योग्य नियोजन गरजेचे

दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात रब्बी हंगामाची लगबग पाहवयास मिळत असते. पण यंदाचे चित्र हे पावसामुळे बदलले आहे. त्यामुळे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी सुरु होणारा रब्बी हंगामाला यंदा नोव्हेंबर महिना उजाडणार आहे.

यंदा रब्बी हंगाम लांबणीवर, योग्य नियोजन गरजेचे
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 5:39 PM

लातूर : पावसाचा परिणाम केवळ (Kharif Hangam) खरीप हंगामातील पीकावरच झालेला नाही तर आगामी रब्बी हंगामही या पावसामुळे लांबणीवर गेलेला आहे. अद्यापही खरीपातील पीकांची काढणी कामेच सुरु आहेत. दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात रब्बी हंगामाची लगबग पाहवयास मिळत असते. (Rabbi Hangam) पण यंदाचे चित्र हे पावसामुळे बदलले आहे. त्यामुळे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटी सुरु होणारा रब्बी हंगामाला यंदा नोव्हेंबर महिना उजाडणार आहे.

मात्र, शेतकऱ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही. रब्बी हंगामातील पीकांसाठी मोठ्या प्रमाणात मशागत करण्याची आवश्यकता नसून केवळ तणनाशकाची फवारणी करुनही रब्बीची पेरणी करता येत असल्याचे कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामच महत्वाचा असतो. यंदा मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीपातील सर्वच पीकाचे नुकसान झालेले आहे. सोयाबीन अजूनही पाण्यातच आहे. त्यामुळे यंदाची रब्बीतील पेरणी ही उशीराने होणार आहे.

खऱीप हंगामाच्या सुरवातीलाच शेती मशागत करण्यात आलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीवर अधिकचा वेळ खर्ची न करता थेट तणनाशकाची फवारणी करुन रब्बीच्या पेरणीला सुरवात करणे आवश्यक आहे. शिवाय पेरणीस उशीर होत असल्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार नसल्याने उत्पादन वाढीच्या अनुशंगाने पेरणी करणे आवश्यक आहे.

गहू- हरभरा हीच मुख्य पीके

खरीपात सोयाबीन आणि रब्बीत गहू आणि हरभरा हीच मुख्य पीके आहेत. हरभऱ्याचे उत्पादन वाढीच्या अनुशंगाने शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून बियाणे वाटपही करण्यात आलेले आहे. शिवाय यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने बागायती क्षेत्रावर पाण्याची कमतरता भासणार नाही. केवळ पेरणी आणि पीकाची निवड हेच महत्वाचे राहणार आहे. मराठवाड्यात हरभरा य़ाच पीकावर शेतकऱ्यांचा भर असतो.

म्हणून हलकी मशागत गरजेची

रब्बी हंगामातील पेरणी ही शेतीची मशागत न करताच केली जाते. पूर्वी शेतामध्ये अधिकचे तण असल्याने ही मशागत केली जात होती. पण आता तणनाशक फवारणीचे पेव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीमध्ये वेळ खर्ची न करता थेट तणनाशकाची फवारणी करुन चाढ्यावर मूठ धरत आहे. याचा उत्पादनावरही काही परिणाम होत नाही,

जिरायत क्षेत्रावर योग्य वेळी पेरणी गरजेची

रब्बासाठी जिरायत आणि बागायत असे क्षेत्र आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने बागायत क्षेत्रावरील ओल ही कायम राहणार आहे. शेत जमिनीत ओल असल्याशिवाय रब्बीची पेरणी करु नये. अन्यथा पीक वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे बागायत क्षेत्रावर तर ओल राहणारच आहे पण जिरायत क्षेत्रावरील ओल ही लवकर गायब होते त्यामुळे या शेतजमिनीवर योग्य वेळी पेरणी होणे गरजेचे आहे.

यंदा रब्बीचा पेरणी उशीराने

दरवर्षी रब्बीची पेरणी ही 15 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान होत असते. यंदा मात्र, अतिवृष्टीचा परिणाम थेट रब्बीच्या पेरणीवरही झाला आहे. अजूनही मराठवाड्यात सोयाबीनची काढणी कामे सुरुच आहेत. त्यामुळे काढणी कामे उरकल्यानंतर शेतीची मशागत आणि पुन्हा पेरणी केली जाणार आहे. (Additional rains to sow rabi season late, need proper planning)

संबंधित बातम्या :

रब्बी हंगाम : पुसा वाणाच्या गव्हाची लागवड करा अन् विक्रमी उत्पादन मिळवा

काय सांगता ? जनावरांसाठीही आता चॉकलेट कॅंडी, पोषण आहार अन् सर्वकाही

यंदा सोयाबीन घाट्यातच ; हंगामातील सर्वात कमी दर, शेतकरी चिंतेत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.