‘ई-पीक पाहणी’ आता ‘ई- गिरदावरी’, महाराष्ट्रातील यशानंतर राजस्थानात राबवला जाणार हा उपक्रम

अवघ्या पाच महिन्यांमध्ये 'ई-पीक पाहणी' हा उपक्रम राज्यात यशस्वी झाला होता. नुकसानभरपाईच्या दरम्यान, ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करणारे शेतकरी हे समोर आले होते. राज्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राजस्थान सरकार हाच उपक्रम 'ई-गिरदावरी' या नावाने राबवणार आहे.

'ई-पीक पाहणी' आता 'ई- गिरदावरी', महाराष्ट्रातील यशानंतर राजस्थानात राबवला जाणार हा उपक्रम
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 7:15 AM

मुंबई : (E-Pik- Pahani) ‘ई-पीक पाहणी’चा प्रयोग राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. गत खरीप हंगामापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सुरवातीला अनेकांनी या प्रणालीतील चुकांवर बोटही ठेवले. विरोधकांनीही तर हा उपक्रमच बंद करण्याची मागणी केली होती. मात्र, यामुळे कारभारात नियमितता आणि थेट (Farmer) शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निरसण झाले होते. अवघ्या पाच महिन्यांमध्ये ‘ई-पीक पाहणी’ हा उपक्रम राज्यात यशस्वी झाला होता. (crop loss) नुकसानभरपाईच्या दरम्यान, ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करणारे शेतकरी हे समोर आले होते.

राज्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता राजस्थान सरकार हाच उपक्रम ‘ई-गिरदावरी’ या नावाने राबवणार आहे. हा उपक्रम कृषी आणि महसूल विभागाला दिशादर्शक ठरत असल्याचे राजस्थानचे महसूल मंत्री रामलाल जाट यांनी म्हटल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

‘ई-पीक पाहणी’मुळे आर्थिक नियोजन

‘ई-पीक पाहणी’चा मुळात हाच उद्देश होता की, कारभारात तत्परता यावी. यापूर्वी महसूल विभागाकडे मनुष्यबळाचा आभाव असल्याने कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता पिक पेरा घेत होते. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, या नविन उपक्रमामुळे शेतकरी हे काळजीने पिकपेऱ्याची नोंद करीत आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईपासून कोणी वंचित राहत नाही. यामुळे पिकांची आकडेवारी, उत्पादकता, शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन याची सांगड घालण्यात सरकार यशस्वी ठरलेले आहे.

अगोदर पथकाकडून पाहणी मगच घेतला निर्णय

महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या ‘ई-पीक पाहणी’ या उपक्रमाचा अभ्यास करण्यासाठी राजस्थान सरकारने एक पथक राज्यात पाठवले होते. यामध्ये जिल्हाधिकारी, ‘एनआयसी’ तांत्रिक अधिकारी यांनी उपक्रमाची माहिती घेतली. एवढेच नाही तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. या पथकाने डिजीटल सातबारा म्हणजेच ई- फेरफार प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय घेतला आहे. मात्र, हा उपक्रम राजस्थानमध्ये ‘ई-गिरदावरी’ या नावाने ओळखला जाणार आहे.

‘ई-पीक पाहणी’ अॅपच्या माध्यमातून नोंदणी

यंदा प्रथमच राज्य सरकारने ई-पीक पाहणीचा प्रयोग खरीप हंगमात राबवण्याचे धोरण आखले होते. मात्र, यावरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण अनंत अडचणींवर मात करुन हा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. या ई-पीक पाहणीचा अहवाल हा समोर आला असून राज्यातील तब्बल 58 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद या माध्यमातून करुन शासन दरबारी पाठवली होती. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्याचे महसूल विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. या यशानंतरच आता राजस्थान सरकार हा प्रयोग राबवणार आहे.

संबंधित बातम्या :

शिंदखेडची भेंडी भाव खातेय लंडनच्या बाजारपेठेत, शेतकऱ्यांच्या एकजूटीचा निर्णय अन् फळही

Untimely Rain : उरली-सुरली आशा अवकाळीने मावळली, वादळी वाऱ्याने फळबागासह पीके आडवी झाली

साखर कारखान्यांच्या माध्यमातूनच ऊसतोड कामगारांचे हीत, समाजकल्याण विभागाचा काय आहे निर्णय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.