Pandharpur : अवकाळी नव्हे आता मान्सूनपूर्व पावसाने नुकसान, फळबागांना अधिकचा फटका
यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा प्रत्ययही येण्यास सुरवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस शेती मशागत केलेल्या क्षेत्रासाठी पोषक आहे तर उभ्या असलेल्या फळबागांचे मात्र, नुकसान हे ठरलेलेच आहे.
पंढरपूर : गेल्या काही महिन्यांपासून (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा शेती पिकांवर राहिलेलाच आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा अवकाळी पावसाचा तो ही (Fruit Crop) फळफिकांना अधिक बसला आहे. त्यानंतर आता कडाक्याच्या उन्हानंतर (Monsoon) मान्सूनपूर्व पावसाला सुरवात झाली असून उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी सुरु असली तर फळबागांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. दोन दिवसांपासून पंढरपूरसह परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी तर पहाटेपासूनच पावसाला सुरवात झाल्याने केळी बागांचे मोठे नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडत आहेत. तर द्राक्षांच्या घडाचेही नुकसान होत आहे. आतापर्यंत अवकाळीचा धोका होता आणि आता मान्सूनपूर्व पावसाचा. त्यामुळे काहीही झाले तरी नुकसान हे शेतकऱ्यांचेच होत आहे.
दोन दिवस पावसाचेच
यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा प्रत्ययही येण्यास सुरवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस शेती मशागत केलेल्या क्षेत्रासाठी पोषक आहे तर उभ्या असलेल्या फळबागांचे मात्र, नुकसान हे ठरलेलेच आहे. तालुक्यातील पटवर्धन कुरोलि येथील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे तर कासेगाव, टाकळी या भागत द्राक्ष पिकाचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्षांची विक्री व्यापाऱ्यांना तरी करावी अन्यथा बाजारपेठ जवळ करुन द्राक्ष विक्री करवाी. अन्यथा नुकसान हे अटळ आहे. तर दुसरीकडे उन्हाळी हंगामातील पिकेही शेतामध्ये उभी असून काही ठिकाणी काढणी कामे सुरु झाली आहेत. भुईमूग, उन्हाळी सोयाबीन याची काढणी झाली की लागलीच सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी किंवा मळणी करुन विक्री असे पर्याय शेतकऱ्यांसमोर आहेत. 1 जूनपर्यंत हंगामी पिके शेतीबाहेर काढून आगामी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज होणे गरजेचे असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
हंगामाच्या अंतमि टप्प्यातही द्राक्षाचेच नुकसानच
द्राक्ष उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम केवळ नुकसानीचाच होता. आता अंतिम टप्प्यात का होईना उत्पादन पदरी पडेल असा आशावाद होता पण आता अवकाळी नव्हे तर मान्सूनपूर्व पावसाने धडाका सुरु केला आहे. पंढरपूर तालुक्यात द्राक्ष, केळी अशा बागांचे नुकसान तर झालेच आहे पण मळणीपूर्वी साठवणूक करणाऱ्या पिकांचीही अशीच अवस्था झाली आहे. द्राक्ष उत्पादकांना तर उभारी घेण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. एकीकडे पावसामुळे नुकसान होत असताना दुसरीकडे ढगाळ वातावरण कायम आहे.