Excess sugarcane: साखर आयुक्तांच्या सूचना अन् गावस्तरावर अंमलबजावणी, लागेल का अतिरिक्त उसाचा प्रश्न निकाली!
यंदाच्या हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक ना अनेक पर्याय समोर आले होते. पण हंगाम अंतिम टप्पा सुरु असतानाही अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. विशेषत: मराठवाड्यात हा प्रश्न अधिक बिकट बनला आहे. याअनुशंगाने साखर आयुक्त शेखर गायकवाड व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन अतिरिक्त उसाचा अहवाल तयार करण्याचे धोरण ठरवले आहे.
बीड : यंदाच्या हंगामात (Excess Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक ना अनेक पर्याय समोर आले होते. पण (Sugarcane Sludge) हंगाम अंतिम टप्पा सुरु असतानाही अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. विशेषत: (Marathwada) मराठवाड्यात हा प्रश्न अधिक बिकट बनला आहे. याअनुशंगाने साखर आयुक्त शेखर गायकवाड व किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन अतिरिक्त उसाचा अहवाल तयार करण्याचे धोरण ठरवले आहे. त्यानुसार मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांमध्ये समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ज्या बीड जिल्ह्यातून अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये यंत्रणा ही कामाला लागलेली आहे. शिल्लक उसाची नोंद घेण्यास सुरवात झाली आहे.
नेमकी प्रक्रिया काय सुरु आहे?
गावनिहाय किती ऊस शिल्लक आहे याची नोंद करुन घेण्यासाठी ग्रामसेवक व कृषी सहयाकापासून यंत्रणा कामाला लागलेली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनीही सूचना केल्या आहेत. त्यानुसार तब्बल 95 अधिकारी-कर्मचारी हे कामाला लागलेले आहेत. या दरम्यान, उभ्या उसाच्या क्षेत्राबाबत अचूक माहिती विवरणपत्र-अ मध्ये भरावे लागणार आहे. ही माहिती संकलित करीत असताना त्यामध्ये अचूकता असायला पाहिजे तरच या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. शिवाय या कामात टाळाटाळ केल्यास किंवा अनियमितता आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा तहसीलदार यांच्याकडून देण्यात आला आहे.
गेटकेनवरही येणार निर्बंध
स्थानिक पातळीवर ऊसाचे गाळप किती झाले, नोंदणी झालेल्या उसाची तोड होते की नाही शिवाय स्थानिक पातळीवर कारखान्यांचे गाळप किती अशा सर्व माहितीचे संकलन हे समन्वय अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे. सध्या मराठवाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे आणि याच विभागातील पाच जिल्ह्यामध्ये हे समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. अवघ्या काही दिवसांमध्ये अतिरिक्त उसाचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयाला झाल्यावर ऊस तोडीचे नियोजन केले जाणार आहे.
बीडमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात
अतिरिक्त उसाचा प्रश्न संबंध मराठवाड्यात पेटला आहे. मात्र, किसान सभेने बीड जिल्ह्यामध्ये घेतलेली भूमिका ही निर्णायक ठरत आहे. जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात प्रत्यक्ष अतिरिक्त क्षेत्रावरील नोंदी घेण्यास सुरवात झाली आहे.त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना उसाचा प्रश्न मार्गी लागावा हीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
संबंधित बातम्या :
Onion Market : उन्हाळी कांद्याचे उत्पादनही घटले अन् दरही, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!