Pani Foundation : ‘वॉटर कप’ नंतर पाणी फाउंडेशनची नवी स्पर्धा, यंदाच्या खरिपात 25 लाखाचे बक्षीस जिंकण्याची शेतकऱ्यांना संधी
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत शेतकरी गट यांना सहभागी होता येणार आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून या स्पर्धेची सुरवात होणार आहे.यामध्ये 20 शेतकऱ्यांचा मिळून एक गट तयार केला जाणार आहे. त्या पिकातील तज्ञांसह यशस्वी शेतकऱ्यांकडून त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. उत्पादनासाठी आवश्यक असलेला बीजपुरवठा, पेरणी, औषधोपचार, काढणी या बाबींचे मार्गदर्शन ते देखील मोफत दिले जाणार आहे.
सोलापूर : (Pani Foundation) पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यात आली होती. शिवाय यामध्ये पाणी फाउंडेशनला यशही मिळाले होते. आता (Farm Production) शेती उत्पादन वाढावे आणि जमिनीचा दर्जा सुधारावा या दृष्टीकोनातून यंदाच्या (Kharif Season) खरीप हंगामापासून फार्मर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शेतकऱ्यांचा पीकनिहाय गट राहणार असून राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या गटास तब्बल 25 लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे. सध्या उत्तर सोलापूरात जलसंधारणाची कामे सुरु असताना फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी ही माहिती दिली आहे. जलंसधारणामध्ये पाणी फांउडेशनची महत्वाची भूमिका राहिलेलली आहे. दरवर्षीच्या स्पर्धेतून गावकऱ्यांची एकजूट, जलसंधारण अशी एकापेक्षा एक चांगली कामे झाली आहेत.
शेतकरी गट स्पर्धक अन् मार्गदर्शन मोफत
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत शेतकरी गट यांना सहभागी होता येणार आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून या स्पर्धेची सुरवात होणार आहे.यामध्ये 20 शेतकऱ्यांचा मिळून एक गट तयार केला जाणार आहे. त्या पिकातील तज्ञांसह यशस्वी शेतकऱ्यांकडून त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. उत्पादनासाठी आवश्यक असलेला बीजपुरवठा, पेरणी, औषधोपचार, काढणी या बाबींचे मार्गदर्शन ते देखील मोफत दिले जाणार आहे.
बाजारपेठेची जबाबदारीही फाउंडेशनचीच
स्पर्धा पार पडत असताना आपला उद्देश देखील साध्य होईल यावर पाणी फाउंडेशनचे लक्ष असणार आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना एकात्मिक कीडनियंत्रण असे प्रयोग राबवून रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी व्हावा तसेच विषमुक्त शेतीमाल उत्पादित करण्यावर फांउडेशनचा भर राहणार आहे. ही अनोखी स्पर्धा पार पाडण्यासाठी अभिनेता आमीर खान देखील प्रयत्नशील आहेत.
फार्मर कपचा नेमका उद्देश काय?
आतापर्यंत वाटर कप स्पर्धेतून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. यामुळे पाणीपातळी वाढली असून अनेक गावे ही टॅंकरमुक्त झाली आहेत. आता 20250 पर्यंत भुकबळींची संख्या वाढेल असा इशारा देण्यात आला आहे. त्याअनुशंगाने जमिनीचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. शिवाय शेतीमाल वाढीव उत्पादनाच्या नव्या बाबी या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या निदर्शनास याव्यात या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या बाबी समोर येणार असून शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे.