Vineyard : अवकाळी, डाऊनी मिल्डयु नंतर आता द्राक्ष बागायतदारांसमोर नवेच संकट, काय आहे उपाययोजना ?
हजारो रुपये खर्ची करुन शेतकरी द्राक्ष बागा पुन्हा उभारणीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, आता काढणीला सुरवात होण्याच्या तोंडावर पुन्हा संकट उभा राहिलेले आहे ते वटवाघळांचे. अवकाळीतून बचावलेल्या द्राक्षावर वटवाघळांच्या थेट धाडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय आता या पक्षांच्या तावडीतून द्राक्षांची सुटका करावी कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.
सांगली : शेतकऱ्याच्या पिकाचे उत्पन्न त्याच्या पदरी पडेपर्यंत त्याचा भरवासा नाही. याचा सर्वाधिक प्रत्यय यंदा (Vineyards) द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आलेला आहे. सर्वकाही सुरळीत असताना ऑक्टोंबर पासून (Untimely Rain) अतिवृष्टी आणि अवकाळीची अवकृपा राहिलेली आहे. यानंतरही हजारो रुपये खर्ची करुन शेतकरी द्राक्ष बागा पुन्हा उभारणीसाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, आता काढणीला सुरवात होण्याच्या तोंडावर पुन्हा संकट उभा राहिलेले आहे ते वटवाघळांचे. अवकाळीतून बचावलेल्या (bird risk) द्राक्षावर वटवाघळांच्या थेट धाडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक संकट कमी म्हणून की काय आता या पक्षांच्या तावडीतून द्राक्षांची सुटका करावी कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.
अगोदर अच्छादन आता बागांना जाळ्या
मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणापासून द्राक्ष बागा सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण बागेला अच्छादन करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली होती. त्या दरम्यान, लाखोंचा खर्च करुन सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बागेचे संरक्षण केले होते. आता द्राक्ष तोडणी ही अवघ्या 15 दिवसांवर असतानाच वटवाघळ थेट द्राक्ष घडावरच हल्ला चढवत आहेत. त्यामुळे ज्याच्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली ते द्राक्षाचे घडच उध्वस्त होत आहेत. त्यामुळे आता बागांच्या कडेने जाळ्या माराव्या लागत आहेत. उत्पन्नापेक्षा यंदा बाग जोपासण्यावरच अधिकचा खर्च होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
रात्रीतून 2 ते 3 एकराचा सुपडासाफ
शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर वटवाघूळ रात्रीतून पाणी फेरत आहेत. सध्या द्राक्षांमध्ये साखर भरुन घड हे पक्व झाले आहेत. दिवसभर शेतकरी हे शिवारात असल्याने द्राक्ष बागांचे रक्षण होते मात्र, रात्री 10 ते 11 नंतर वटवाघळाचे थवेच थेट द्राक्ष बागांमध्ये घसतात. रात्रभर धुमाकूळ घालत एका रात्रीतून ते 2 ते 3 एकरातील द्राक्ष उध्वस्त करीत आहेत. आता हे नुकसान काही औषध फवारुन भरुन निघण्यासारखे नाही त्यामुळे घड उध्वस्त झाला तर त्याचा थेट परिणाम आता उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे.
बागायती शेतकऱ्यांसमोर दुहेरी समस्या
मोठ्या कष्टाने द्राक्ष बागांची जोपासना करण्यात आली आहे. किमान वर्षभर झालेला खर्च तरी पदरात पडावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. द्राक्ष बागांचे करार झाले आहेत. व्यापाऱ्यांकडून अधिकचे पैसेही शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. आता द्राक्ष पाहणीनंतर जर व्यापाऱ्यांनी ना केली तर काय करावे हा प्रश्न आहे. दुसरीकडे यापूर्वी पक्षांपासून बचावासाठी हलक्या जाळ्या लावल्या तरी संरक्षण होत होते पण आता वटवाघळांसाठी जाडसर जाळी लावावी लागत आहे. त्यासाठी अधिकचा पैसा मोजावा लागत आहे.