Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाव आणि शहरातील जमीन विक्रीवर कर द्यावा लागतो? जाणून घ्या काय असतात नियम?

जमीन खरेदी आणि विक्रीसंदर्भात अनेक नियम असतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या सहजपणे ते लक्षात येत नाहीत. जमीन खरेदी आणि विक्रीसंदर्भात त्या क्षेत्रातील माहिती असणाऱ्या जानकारांची गरज लागते. Urban and Rural land selling tax

गाव आणि शहरातील जमीन विक्रीवर कर द्यावा लागतो? जाणून घ्या काय असतात नियम?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 11:21 AM

नवी दिल्ली: जमीन खरेदी आणि विक्रीसंदर्भात अनेक नियम असतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या सहजपणे ते लक्षात येत नाहीत. जमीन खरेदी आणि विक्रीसंदर्भात त्या क्षेत्रातील माहिती असणाऱ्या जानकारांची गरज लागते. आपल्या देशात जमीन खरेदी आणि विक्री हा मोठा व्यापार आहे. जमीन खरेदी आणि विक्रीसंदर्भात अनेक प्रकारचे व्यवसाय सुरु असतात. जमीन खरेदी आणि विक्रीवर देखील कर आकारला जातो. कोणती जमीन विकताना कर द्यावा लागतो? गावातली जमीन आणि शहरातील जमीन याबाबत काही वेगळे नियम असतात का? हे जाणून घेणं आवश्यक आहे. (Agricultural land of Urban and Rural land selling tax know the rules)

शेतीच्या जमिनीचे दोन प्रकार

शेतीची जमीन दोन प्रकारची असते, पहिल्या प्रकारात शेतीची जमीन असते ज्यावर शेतकरी शेती करतात. दुसरा प्रकार हा शहरी शेतीचा असतो. ही शेती शहरांच्या जवळपास केली जाते. ग्रामीण क्षेत्रातील जमीन विकताना दस्त नोंदणी शुल्क वगळता इतर कोणताही कर द्यावा लागत नाही. गावातील शेतीची जमीन विकताना कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही सर्व प्रक्रिया करमुक्त आहे.

शहरी भागातील जमीन विक्रीसाठी कर

जर शेती शहरी बागातील असेल तर त्यावर काही नियम लागू होतात. ग्रामीण भागातील जमिनीसारखी ती करमुक्त नसते. मात्र, 54B नुसार करातून सवलत घेता येता. जी जमीन 10 लाख लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या 8 किमी अंतरावर असेल ती ग्रामीण शेती मानली जात नाही. ही जमीन कराच्या कक्षेत येते. कर वाचवण्यासाठी नियम 54Fनुसार घरांमध्ये गुंतवणूक करावी.

54B नुसार सूट कशी मिळवावी

1.विक्री केली जाणाऱ्या जमिनीवर दोन वर्षापर्यंत शेती केलेली असावी. 2.जमीन विक्रीतून मिळालेली रक्कम शेतीमध्ये गुंतवली पाहिजे. 3.नवीन खरेदी केलेली जमीन तीन वर्षांपर्यंत विक्री करता येणार नाही. 4. आयकर रिटर्न भरण्याच्या मुदतीपर्यंत शेती केल्या जाणाऱ्या जमिनीत गुंतवणूक करता आली नाही तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या कॅपिटल गेन डिपॉझिट स्कीममध्ये खाते उघडून त्यात गुंतवणूक करावी लागेल.

भारतात शेत जमीन किंवा शेतीशी संबंधित घटकांतून मिळालेल्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही.

संबंधित बातम्या:

बोंडअळीचं संकट कमी, शेतकरी पुन्हा पांढऱ्या सोन्याकडे, बळीराजाला दमदार पावसाची प्रतिक्षा

अनलॉक होताच नागवेली पानाची मागणी वाढली, पान विड्याला लाली आली!

Agricultural land of Urban and Rural land selling tax know the rules

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.