Warehousing Corporation : शेतीमालाच्या घटत्या दरात शेतकऱ्यांना आधार कशाचा? कोट्यावधींचे कर्ज अन् शेतीमालही सुरक्षित

शेतीमाल साठवणूकीतून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीमाल निहाय क्लस्टरमध्ये कर्ज वितरणाची योजना आहे. राज्य सहकारी बॅंकेमार्फत ही योजना राबवली जाते. खरीप आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर या योजनेचा अधिक लाभ घेतला जातो. बाजारपेठेत शेतीमलाला दर नाही आणि शेतकऱ्यास पैशाची गरज भासल्यास ही शेतीमाल तारण योजना शेतकऱ्यांच्या कामी पडत आहे.

Warehousing Corporation : शेतीमालाच्या घटत्या दरात शेतकऱ्यांना आधार कशाचा? कोट्यावधींचे कर्ज अन् शेतीमालही सुरक्षित
वखार महामंडळ
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 2:52 PM

पुणे : आवक वाढली की (Agricultural Good) शेतीमालाचे दर घसरणार हे बाजारपेठेचे सूत्र आहे. असाच काहीसा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे.  (Kharif Crop) खरिपातील साठवणूक केलेल्या आणि रब्बीती नव्याने बाजारपेठेत दाखल झालेल्या शेतीमालाचे दर वाढले नाहीत. घटत्या दरात मालाची विक्री हे शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. त्यामुळे खरिपाप्रमाणे पुन्हा रब्बी हंगामात बाजारपेठा वगळता शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे तो (Agricultural Mortgage Scheme) शेतीमाल तारण योजनेचा. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनेचा गेल्या दोन वर्षापासून खऱ्या अर्थाने वापर होऊ लागला आहे. गेल्या दोन महिन्याच्या काळात शेतीमाल तारण योजनेतून शेतकऱ्यांनी 7 कोटी 49 लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे.

‘ब्लॉकचेन’द्वारे कर्जाचे वितरण

शेतीमाल साठवणूकीतून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीमाल निहाय क्लस्टरमध्ये कर्ज वितरणाची योजना आहे. राज्य सहकारी बॅंकेमार्फत ही योजना राबवली जाते. खरीप आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर या योजनेचा अधिक लाभ घेतला जातो. बाजारपेठेत शेतीमलाला दर नाही आणि शेतकऱ्यास पैशाची गरज भासल्यास ही शेतीमाल तारण योजना शेतकऱ्यांच्या कामी पडत आहे. यामध्ये शेतकरी शेतीमाल ठेऊन त्यावर कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांची गरज तर भागते पण शेतीमालही टिकून राहतो. योग्य दर मिळाला की त्याची विक्रीही करता येते.

दोन महिन्यात हळद पिकातून सर्वाधिक व्यवहार

गेल्या दोन महिन्यात शेतीमालाचे दर घसरले आहेत. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पादकता ही वाढलेली आहे. असे असताना शेतकऱ्यांनी आधार घेतला तो शेतीमाल तारण योजनेचा. 1 हजार 931 टनाच्या शेतीमाल तारणातून शेतकऱ्यांना 7 कोटी 49 लाख रुपये कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये कर्ज हे हळदीपोटी घेतले गेले आहे तर त्यापाठोपाठ सोयाबीनवर शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. आता हळद आणि सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यावरच शेतकऱ्यांना ते अधिकच्या दरात विक्री करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

शेतमालाचे प्रकारानुसार कर्जवाटप व व्याजदर

शेतमाल प्रकार : सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडीद, भात , करडई, मुग, हळद, चना या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

शेतमाल प्रकार : मका,ज्वारी, गहू, बाजरी या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

शेतमाल प्रकार : बेदाणा या मालाकरिता बाजारभावातील एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेडीची मुदत ही सहा महिन्याची असून याकरीता 6 टक्के व्याजदर आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.