Recycling of water: सांडपाण्याच्या पुनर्वापरावर बदलणार शेती व्यवसयाचे चित्र, शेती व्यवसायच जल परिषदेच्या ‘केंद्रस्थानी’

काळाच्या ओघात शेती व्यवसयात अमूलाग्र बदल होत आहे. आत्याधुनिक यंत्रामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी पाण्याशिवाय शेती व्यवसाय हा होऊच शकत नाही. पाणी हेच महत्वाचे असताना भारत देशात नेमके याकडेच दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलने सांडपाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे शेती व्यवसयात हा बदल क्रांतीकारक ठरला आहे. जलसंवर्धन जेवढे महत्वाचे आहे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे ते पाण्याचा वापर. पाणी हे केवळ पिण्यापुरतेच मर्यादित नाही तर आता यापुढे जाऊन शेतीसाठीही पाण्याचा वापर कसा वाढवता येईल महत्वाचे आहे.

Recycling of water: सांडपाण्याच्या पुनर्वापरावर बदलणार शेती व्यवसयाचे चित्र, शेती व्यवसायच जल परिषदेच्या 'केंद्रस्थानी'
राष्ट्रीय जल परिषदेत शेती व्यवसयात पाण्याचा पुनर्वापर यावरच मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे, Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 5:05 AM

मुंबई : काळाच्या ओघात (Farming) शेती व्यवसयात अमूलाग्र बदल होत आहे. आत्याधुनिक यंत्रामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी पाण्याशिवाय शेती व्यवसाय हा होऊच शकत नाही. (Water) पाणी हेच महत्वाचे असताना भारत देशात नेमके याकडेच दुर्लक्ष होत आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलने (Recycling of sewage) सांडपाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे शेती व्यवसयात हा बदल क्रांतीकारक ठरला आहे. जलसंवर्धन जेवढे महत्वाचे आहे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे ते पाण्याचा वापर. पाणी हे केवळ पिण्यापुरतेच मर्यादित नाही तर आता यापुढे जाऊन शेतीसाठीही पाण्याचा वापर कसा वाढवता येईल महत्वाचे आहे. विलेपार्ले येथील बी.जे. सभागृहात ब्रम्हा रिसर्च फाऊंडेशन या मुंबईस्थित स्ट्रॅटेजिक रिसर्च थिंक टँकने आयोजित केलेल्या “इंडिया वॉटर व्हिजन 2040 अँड बियॉन्ड” या राष्ट्रीय जल परिषदेत पाण्याचे महत्व आणि संवर्धन या विविध पैलूने विचार मांडण्यात आले असले तरी शेतीसाठी पाणी हाच मुद्दा केंद्रस्थानी होता.

भारतामध्ये पीक पध्दतीमध्ये बदल, सिंचनाचे काय?

भारत देशामध्ये पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढविले आहे. मात्र, त्या तुलनेत सर्वच शेतकऱ्यांनी सिंचन पध्दतीमध्ये बदल केला आहे असे नाही. आजही पाठाद्वारे पाणी दिले जात आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलमध्ये अमूलाग्र बदल झाले आहेत. कृषी क्षेत्रात इस्रायलने ठिबक सिंचनाचा शोध लावला, आपली संपूर्ण शेती पूर सिंचनातून सूक्ष्म सिंचनावर आणली, पाणी कार्यक्षम पिकांकडे वळले आणि शेतीसाठी पुनर्वापर केलेले पाणी वापरण्यास सुरुवात केली. धोरणात्मक निर्णय म्हणून शेतकऱ्यांना पुनर्वापर केलेले पाणी वापरण्यास प्रोत्साहन दिले जाते. हेच बदल भारतामधील शेती व्यवसायात झाल्यावर त्याचा फायदा होणार असल्याचे मत या जल परिषदेतून समोर आले आहे. यावेळी राष्ट्रीय जल परिषदेत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, आमदार अँड आशिष शेलार, अमरीश पटेल, फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. विजय पागे उपस्थित होते.

इस्त्रायलमध्ये शेतीसाठी पाण्याचे असे हे नियोजन

इस्त्रायलने दुष्काळावर मात करण्यासाठी पाच मोठे भूमीजल पृथ्थकरणाचे प्रकल्प सुरु केले. ज्यामुळे घरगुती वापरासाठी लागणाऱ्या पाण्यांपैकी ७५ टक्के पाण्याची निर्मिती केली जाते. जल व्यवस्थापनामधील सर्वात मुख्य भाग म्हणजे यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे नियोजन. इस्त्राइल या राष्ट्राचे जल व्यवस्थापन हे संपूर्णपणे तेथील सांडपाण्याशी जोडलेले आहे. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करुन त्याचा शेतीला वापर करण्यामध्ये इस्त्राइल हा देश आघाडीवर आहे.भूगर्भामधील जलसंचय जल व्यवस्थापन शाश्वत करावयाचे असेल तर भूगर्भामधील जलसंचय वाढणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पडणारा पाऊस जमिनित मुरणे हे महत्त्वाचे असल्याचे इस्रायलचे महावाणिज्यदूत कोब्बी शोशानी यांनी सांगितले आहे.

बोअर घेणे हे जल व्यवस्थापनाच्या विरोधातले कृत्य

पाण्याच्या शोधात बोअर घेण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. बोअरच्या माध्यमातून अनियंत्रित पाण्याचा वापर होतो. जो जलव्यवस्थापनाच्या विरोधात आहे. यामुळेच इस्त्रायलने आपल्या सर्व नागरिकांना रात्रंदिवस पाणी उपलब्ध करुन दिले असून पाण्याची दरडोई मागणीही कमी करण्यात यश आले आहे. याखेरीज, विशेष बाब म्हणजे, इस्त्रायलमध्ये वापरात येणारे जवळपास ९० टक्के सांडपाण्याचा पुर्नवापर कऱण्यात येतो, या पाण्याचा वापर शेतीसाठी आणि भूजल पुनर्भरणीसाठी केला जातो.इस्रायलच्या जल कायद्यानुसार, देशातील जलस्रोत ही सार्वजनिक मालमत्ता आहे. ही मालमत्ता रहिवाशांच्या गरज पडताळून यंत्रणांद्वारे देशाच्या विकासाकरिताही योगदान देत असल्याचे शोशानी यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Water Council : देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जल साक्षर पिढी घडवणे महत्वाचे, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मांडले केंद्राचे धोरण

Onion Rate : कांदा दराचा वांदा मिटणार! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची काय आहे रणनिती?

Sugarcane Sludge : ऊस फडातच, गाळप बंद, सांगलीत साखर आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.