Untimely Rain : जिल्ह्यात अवकाळी अन् नुकसानीचा अहवाल एकाच तालुक्याचा, कृषी विभगाच्या रिपोर्टमध्ये दडलंय काय?
पहिल्या टप्प्यात वर्धा, अमरावती आणि नागपूर येथील कृषी विभागाने अहवाल सादर केले तर अमरावती येथील जिल्हा कृषी विभागाने हा पाऊस नुकसानीचा नसून फायद्याचाच असल्याचा जावाई शोध लावला तर आता अकोला कृषी विभागाचा अहवाल पाहिला तर चक्रावून जाताल अशीच स्थिती आहे. अवकाळी, गारपीट ही संबंध जिल्ह्यात नाही तर केवळ अकोला तालुक्यात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अकोला : नुकसान कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमधून झाले तरी (Agricultural Department) कृषी विभागाच्या अवहालानंतरच भरपाईची भूमिका शासनाकडून घेतली जात आहे. या महिन्याच्या सुरवातीला झालेल्या (Untimely Rain) अवकाळी, गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल सध्या शासनाकडे सपूर्द करण्याचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा, अमरावती आणि नागपूर येथील कृषी विभागाने अहवाल सादर केले तर अमरावती येथील जिल्हा कृषी विभागाने हा पाऊस नुकसानीचा नसून फायद्याचाच असल्याचा जावाई शोध लावला तर आता अकोला कृषी विभागाचा अहवाल पाहिला तर चक्रावून जाताल अशीच स्थिती आहे. अवकाळी, गारपीट ही संबंध जिल्ह्यात नाही तर केवळ (Akola) अकोला तालुक्यात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता उर्वरीत भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे काय हा सवाल कायम आहे. जिल्ह्यातील केवळ 997 हेक्टरावरील पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एका तालुक्यात अन् चार पिकांचे नुकसान
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर अवकाळी पाऊस आणि गारपिट असे दुहेरी संकट होते. सबंध राज्यात कमी-अधिक प्रमाणात या प्रतिकूल परस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे झालेले आहे. रब्बी हंगामातील पिके जोमात होती तर खरीपातील कापूस, तूर ही अंतिम टप्प्यात. असे असताना केवळ अकोला तालुक्यातीलच गहू, हरभरा, तूर, कापसाचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अकोला तालुका वगळता कुठेच पाऊस झाला नाही का असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. त्यामुळे अहवालानुसारच मदत मिळणार का पुन्हा नुकसानीचा आढावा घेतला जाणार हे पहावे लागणार आहे.
जिल्ह्यात या ठिकाणी झाला होता अवकाळी पाऊस
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल हा सहसंचालक कार्यालयाकडे देण्यात आला आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला कुरणकेड, मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्यातील हातरुण, शिंगोली, कारंजा, रमजानपूर या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. मात्र, कृषी विभागाने अजब दावा करीत केवळ एकाच तालुक्यात नुकसान असल्याचे सांगितले आहे. हा प्राथमिक अंदाज असल्याचे कृषी सहसंचालकाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
खरिपासह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे अतिवृष्टीमुळे तर आता रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान वातावरणातील बदल, अवकाळी आणि गारपिटमुळे झाले आहे. शेतकऱ्यांनी सर्वकाही नियोजन करुन पीक पध्दतीमध्ये यंदा प्रथमच बदल केला होता.त्यामुळे उत्पादनात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरच पाणी फेरले. हे कमी म्हणून की काय पुन्हा कृषी विभागाने केवळ अकोला ह्या एकाच तालुक्यात नुकसान झाल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
15 दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर, काय आहेत कारणे? शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक