नवी दिल्ली: पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 1 लाख 37 हजार 192 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी या योजनेची सुरुवात 2019 झाली होती, अशी माहिती दिली आहे. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे एका वर्षात 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येतात. सरकारनं आतापर्यंत 8 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याची रक्कम देण्याचं काम सुरु असून ते 31 जुलैपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या नवव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं तयारी सुरु केली आहे. (Agriculture Minister Narendra Singh Tomar said one lakh 37 thousand crore rupees transfer to farmers account under PM Kisan)
PM श्री @narendramodi जी के नेतृत्व में 2019 में #PMKisanSammanNidhi योजना का शुभारंभ हुआ, जिसमें 3 समान किश्तों में प्रति वर्ष 6000 रु किसान परिवारों को आय सहायता प्रदान की जाती है।
अब तक 10.90 करोड़ किसान परिवारों को 1,37,192 करोड़ रु जारी किए जा चुके हैं।#ProsperousFarmers
— Narendra Singh Tomar (@nstomar) June 11, 2021
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आतापर्यंत 30 महिने पूर्ण झाले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. आता पीएम किसान योजनेच्या ननव्या हप्त्याची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी संघटनांकडून या मदतीची रक्कम वाढवण्याची मागणी केली जात आहे.
पीएम किसान सन्मान योजनेचा नवव्या हप्त्याची तयारी ऑगस्टपासून केली जाणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेमध्ये नोंदणी केली नाही. त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी आता नोंदणी केली आणि त्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यास त्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील मिळू शकतात. पीएम किसान सन्मान योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येते. गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 21 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहे.
सर्वात यशस्वी योजना
मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरुवात करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी, अशी मागणी केली आहे.
संबंधित बातम्या:
मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा
खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर, कोणत्या पिकाची MSP सर्वाधिक वाढली?
(Agriculture Minister Narendra Singh Tomar said one lakh 37 thousand crore rupees transfer to farmers account under PM Kisan)