खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढा, पण ‘अशी’ करा पूर्वतयारी…

शेतकऱ्यांनी (Rabbi Hangam) रब्बी हंगमाबाबत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कारण यंदाही खरीपात शेतकऱ्यांनी योग्य नियोजन न केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पुन्हा तीच चूक न होऊ देता पेरणीपूर्वीची मशागत किती महत्वाची असते हे आपण आज पाहणार आहोत....

खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामातून भरुन काढा, पण 'अशी' करा पूर्वतयारी...
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 10:42 AM

लातूर : खरीपात (Kharif Hangam) निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पाण्यात आहे तर तूरही धोक्यात आहे. आता खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अशाच परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी (Rabbi Hangam) रब्बी हंगमाबाबत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कारण यंदाही खरीपात शेतकऱ्यांनी योग्य नियोजन न केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पुन्हा तीच चूक न होऊ देता पेरणीपूर्वीची मशागत किती महत्वाची असते हे आपण आज पाहणार आहोत….

उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामच मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा समजला जातो. मात्र, या हंगामावर मान्सूनच्या पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. कधी आवर्षणामुळे पीकाचे नुकसान तर कधी अतिवृष्टीमुळे. यंदा तर दुहेरी संकट खरीपातील सर्वच पीकावर होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. आता पीकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांने रब्बी हंगामाचे नियोजन हे पूर्वमशागतीपासून ते पीक निवडण्यापर्यंत करणे आवश्यक आहे.

मशागत करण्यापूर्वी फवारणी

खरीपातील पीकाचे क्षेत्र रिकामे झाले की, पावसामुळे शेतामध्ये लव्हाळा, हराळी तसेच इतर तणाची उगवण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट मशागतीला सुरवात न करता तणनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे. याकरिता मिरा 71 या तणनाशकाची 100 ग्रॅमची पुडी ही 20 लिटर पाण्यात मिसळून फवारणी गरजेची आहे. अन्यथा पेरणीनंतर पीकाबरोबर या तणाचीही उगवण होते. परिणामी पीकाची वाढ खुंटते तर तणाचाच जोर वाढतो. त्यामुळे मशागत करण्यापुर्वी ही फवारणी गरजेची आहे.

नांगरणी

खरीपाचे क्षेत्र रिकामे झाले की, शेताची मशागत होणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादन तर वाढणार आहेच शिवाय जमिनीचा दर्जाही टिकून राहणार आहे. काळाच्या ओघात शेती व्यवसयात अमूलाग्र बदल होताना पाहवयास मिळत आहे. पूर्वी बैलजोडीने नांगरणी, मोगडणी आणि वखरणी (कोळवणी) यासारखी कामे केली जात होती. पण आता ही सर्व मशगतीची कामे यंत्राद्वारे केली जात आहेत. ट्रक्टरनेच हे काम होत असल्याने योग्य वेळी मशागत होऊन योग्य वेळी पेरणीयोग्य शेतही तयार होत आहे.

मोगडणी

नांगरणी झाली की, शेतजमिनीला माफक प्रमाणात ऊन मिळाल्यानंतर मोगडणी करणे अपेक्षित आहे. यामुळे शेतामधील मोठी ढेकळांचे रुपांतर हे मातीमध्ये होते. शिवाय जमिनही पेरणीयोग्य होते. आता मशागतीची कामे ही ट्रक्टरद्वारेच केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत तर बचत होत आहे. शिवाय शेतामध्ये कोणते पीकाचे उत्पादन घ्यावे याचा विचारविनमय करण्यासही वेळ मिळतो. वातादरणातील बदलानुसार पीकाचे उत्पादन घेणे सहज शक्य होते.

वखरणी

नांगरणी, मोगडणी झाल्यानंतर सर्वात शेवटी वखरणी म्हणजेच कुळवणीही हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे जमिन अधिक सुपिक होते. यानंतर ज्या शेतामध्ये पेरणी करायची आहे. त्याला हलक्या प्रमाणात ओल देऊन पेरणी केली तर पीकाची जोमाने वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पेरणीपेक्षा त्यापुर्वी केली जाणारी मशागत ही महत्वाची आहे. पेरणीला उशीर होईल यामुळे अनेक शेतकरी हे मशागत न करताच पेरणीला सुरवाच करतात. यामुळे उत्पादनावर तर परिणाम होणारच शिवाय पीकातील तण काढण्यास अधिकचा पैसाही खर्ची करावा लागणार आहे.

यंदा रब्बीचा पेरणी उशीराने

दरवर्षी रब्बीची पेरणी ही 15 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान होत असते. यंदा मात्र, अतिवृष्टीचा परिणाम थेट रब्बीच्या पेरणीवरही झाला आहे. अजूनही मराठवाड्यात सोयाबीनची काढणी कामे सुरुच आहेत. त्यामुळे काढणी कामे उरकल्यानंतर शेतीची मशागत आणि पुन्हा पेरणी केली जाणार आहे. (agriculture-must-be-cultivated-to-increase-rabi-production-farmers-should-prepare)

संबंधित बातम्या :

पेरु लागवडीतून 32 लाखांची कमाई, मुंबई ते दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री, दिनेश बागड यांनी करुन दाखवलं

मशरुमच्या व्यवसायातून लाखोंची कमाई, तरुणाच्या हातालाही मिळेल रोजगार

संत्र्याच्या फळगळतीला नुकसानभरपाईच नाही, बागायतदारांचे कोट्यावधींचे नुकसान

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.