कृषी क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल : केंद्रीय कृषी मंत्री

शेतीचे आधुनिकीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. डिजीटल कृषीचा उपक्रम हा सुरु करण्यात आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान राहणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.

कृषी क्षेत्रामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल : केंद्रीय कृषी मंत्री
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 5:40 PM

मुंबई : शेती व्यवसयात अमुलाग्र बदल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये कृषी महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठ यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. शेतीसाठी डिजिटल कृषी मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्या शेतीचे आधुनिकीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. डिजीटल कृषीचा उपक्रम हा सुरु करण्यात आला असून देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान राहणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय शेतीने अनेक वेळा आपली प्रासंगिकता सिद्ध केली आहे. वेगवेगळ्या संशोधनामुळे शेती व्यवसायाला बळकटी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठच्या 58 व्या स्थापना दिनाच्या समारंभात केंद्रीय मंत्री तोमर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवाय शेतीबरोबरच ग्रामीण वातावरणात समृद्धी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना तयार केल्या असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मध्य प्रदेशचे कृषिमंत्री कमल पटेल हे देखील विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले की, मध्य प्रदेश शेतीाध्ये अग्रगण्य राज्य बनेल, आम्ही पंजाब आणि हरियाणालादेखील उत्पादनात मागे टाकले आहे. यामध्ये वैज्ञानिकांच्या संशोधनाचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कार्यक्रमाची सुरवात कुलगुरू डॉ. प्रदीपकुमार बिसेन यांच्या भाषणाने झाली होती.

1600 पेक्षा जास्त पिकांचे वाण विकसित झाले

शेतकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन आणि सरकारच्या शेती समर्थक धोरणांमुळे अनेक पिकांचे उत्पन्न या बाबतीत भारत जगात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षांत भारतीय कृषी संशोधन परिषद (ICR) कृषी संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रयांच्या योगदानाने 1600 हून अधिक पीक वाण विकसित करण्यात आले आहेत. जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठानेही 294 प्रगत जाती विकसित केल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कृषी शिक्षण धोरण लागू केले जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरीच देशाला पिकाचे 35 वाण गिफ्ट केले आहेत. याचा लाभ राज्य आणि देशातील शेतकऱ्यांना देण्यात आला असून सर्व शेतकऱ्यांसाठी ते उपलब्ध राहणार आहे. देशभरातील कृषी विद्यापीठांमध्ये नवीन शिक्षण धोरणात कृषी शिक्षण हे सुध्दा लागू केले जाणार आहे.

शेती माल निर्यातीला चालना देण्यासाठी कृषी विद्यापीठांची भुमिका महत्वाची

देशातील शेतीला चालना देण्यासाठी कृषी विद्यापीठांमधून चांगले कृषी शास्त्रज्ञ उदयास येतील अशी आशा तोमर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, शेतमालाची निर्यातीमध्ये कृषी विद्यापीठांचीही भुमिका महत्वाची राहिलेली आहे. (Agriculture sector will strengthen country’s economy: Union Agriculture Minister)

 संबंधित बातम्या :

Latur Market : शेतकरी शेतात, बाजार समितीमध्ये शुकशुकाट

पीक नुकसान मोजण्याचे नेमकं ‘एकक’ काय ? प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर होतंय काय?

देशभरात आता कृषी आवजारांची एकच किंमत, सरकार निर्णयाचा शेतकऱ्यांना होणार फायदा

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.