कृषी सहायक पदाच्या परिक्षेला अखेर स्थगिती, काय आहे कारण ?

डॅा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी सहायक पदाच्या परिक्षा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. याला कारणही तसे वेगळेच आहे. सध्या एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे परिक्षार्थी वेळेवर येऊ शकतील का नाही याबाबत सवाल उपस्थित झाल्याने कृषी सहायकाच्या परिक्षेला कुलसचिवांनी स्थगिती दिलेली आहे.

कृषी सहायक पदाच्या परिक्षेला अखेर स्थगिती, काय आहे कारण ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 11:28 AM

अकोला : परिक्षांच्या आदल्या दिवशी किंवा मध्यरात्री वेळापत्रकात बदल हे काही आता नवे राहिलेले नाही. याकरिता अनेक वेळा नियोजनाचा आभाव आणि सरकारी यंत्रणेतील अवमेळ हाच जबाबदार राहिलेला आहे. (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) मात्र, डॅा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (Agricultural Assistant Exams) कृषी सहायक पदाच्या परिक्षा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. याला कारणही तसे वेगळेच आहे. सध्या एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे परिक्षार्थी वेळेवर येऊ शकतील का नाही याबाबत सवाल उपस्थित झाल्याने कृषी सहायकाच्या परिक्षेला कुलसचिवांनी स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे आता 47 जागांसाठी 14 नोव्हेंबरला होणारी परीक्षा लांबणीवर गेलेली आहे.

दिवाळीच्या आगोदरपासून राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यातच डॅा. पंजाबराव देशमुख विद्यापीठातील कृषी सहायकाच्या 47 पदांसाठी 14 नोव्हेंबर रोजी परिक्षा पार पडणार होती. मात्र, सध्या बसगाड्या ह्या बंद आहेत. शिवाय रेल्वेच्याही मर्यादीतच फेऱ्या सुरु आहेत. त्यामुळे विद्यार्थी हे परिक्षेला मुकण्याची शक्यता निर्माण झाल्याने कृषी विद्यापीठाचे कुलसचिव सुरेंद्र काळबांडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

अकोला येथील डॅा. पंजाबराव देशमुख विद्यापीठात 47 कृषी सहायक पदांची भरती प्रक्रीया ही पार पडणार होती. याकरिता राज्यातून ऑनलाईन अर्जही मागविण्यात आले होते. या परिक्षेसाठी 6 हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे अर्जही केले होते मात्र, आता एस.टी बंद असल्याने विद्यापीठाच्या प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक

कृषी सहायक पदाच्या परिक्षेसाठी अधिकतर विद्यार्थी हे ग्रामीण भागातील होते. आलेल्या नोंदणीवरुन विद्यापीठाच्या हे निदर्शनासही आले होते. मात्र, ग्रामीण भागात एस.टी शिवाय पर्यायच नसल्याने हे विद्यार्थी परिक्षेला वेळेवर येऊ शकणार नाहीत. शिवाय कोरोनामुळे केवळ मुख्य मार्गावरीलच रेल्वेही सुरु आहेत. ऐन वेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी हे परिक्षेपासून वंचित राहिले असते. त्यामुळे 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परिक्षेला तात्पूरती का होईना स्थगिती देण्यात आली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली होती मागणी

ऐन एस.टी बंदच्या दरम्यानच कृषी विद्यापीठातील कृषी सहायक पदाच्या परिक्षांचे आयोजन हे झाले होते. मात्र, सर्वच भागातील एस.टी ही बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असेच दिसत होते. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ह्या नियोजित परिक्षा पुढे घेण्यात याव्यात असे अवाहन केले होते. अखेर हीच गोष्ट कुलसिचव सुरेंद्र काळबांडे यांच्याही निदर्शनास आली. त्यामुळे सध्या तर ही परिक्षा 14 नोव्हेंबर रोजी होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आता परिक्षा होणार तरी कधी

राज्यात ओढावलेल्या परस्थितीमुळे डॅा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला परिक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र, कृषी सहायक पदाच्या या लेखी परिक्षा केव्हा घेण्यात येणार आहेत याबाबत सांगण्यात आलेले नाही. मात्र, लवकरच या परिक्षेचा पुढील दिनांक हा कृषी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसानही टळले आहे. शिवाय ऐन वेळी होणारी गैरसोय आता होणार नाही.

संबंधित बातम्या :

अतिवृष्टीच देणं ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत वाढ, रब्बी हंगामाला पोषक वातावरण

महावितरणच्या ‘कुसुम योजने’चे पहिले पाऊल, प्रकल्प उभारणीसाठी टेंडर

रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘असे’ करा नियोजन..!

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.