Pune : मशागतीविना शेती, तरुण शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात

उत्पादनवाढीसाठी शेती व्यवसयात नवनवीन प्रयोग करणे ही काळाचा गरज झली आहे. असेच प्रयोग घेऊन आता तरुण शेतकरी या व्यवसयात पदार्पण करीत आहेत. पारंपारिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील भोरमधील माळवाडी शिवारात किरण यादव या तरुण शेतकऱ्याने अनेकांना आशेचा किरण मिळेल असाच प्रयोग केला आहे. एसआरटी म्हणजेच शून्य मशागत शेतीचा हा प्रयोग केला आहे.

Pune : मशागतीविना शेती, तरुण शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा शून्य मशागत शेती हा उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे थेट शिवारात दाखल झाले होते.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 9:33 AM

पुणे : उत्पादनवाढीसाठी (Farming) शेती व्यवसयात नवनवीन प्रयोग करणे ही काळाचा गरज झली आहे. असेच प्रयोग घेऊन आता तरुण शेतकरी या व्यवसयात पदार्पण करीत आहेत. पारंपारिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील भोरमधील माळवाडी शिवारात किरण यादव या तरुण शेतकऱ्याने अनेकांना आशेचा किरण मिळेल असाच प्रयोग केला आहे. एसआरटी म्हणजेच शून्य (Farm Cultivation) मशागत शेतीचा हा प्रयोग केला आहे. यामुळे (Production) उत्पादनात वाढ तर झालीच आहे पण खर्चही कमी होत आहे. किरणचा हा अत्याधुनिक उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे थेट बांधावर दाखल झाले होते. किरण यांनी केलेल्या अभिनव उपक्रमामुळे त्यांना शासनाकडूनही अनेक पारितोषिके मिळाली असून आता या भागातील शेतकऱ्यांसाठी त्यांचा हा प्रयोग नवसंजीवनी ठरत आहे.

काय आहे शून्य मशागती शेती?

दिवसेंदिवस उत्पादनावरील खर्च वाढत आहे. शिवाय खर्च करुनही पीक पदरी पडेल असे सांगता येत नाही. त्यामुळे उत्पादनावर खर्च करुन अधिकचे उत्पादन पदरी पाडून घेणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. त्याच अनुशंगाने माळवाडी येथील किरण यादव यांनी एस.आर.टी म्हणजेच शून्य मशागत शेती असे आधुनिक तंत्रज्ञान वापरुन उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. यामुळे उत्पादनावरील खर्चात बचत होत आहे. शिवाय यंत्राच्या सहाय्याने शेती होत असल्याने सर्व काही जिथल्या तिथे. त्यामुळे शेतीचे रुपडेच बदलत आहे. यामुळे आता उत्पादनातही वाढ होत असून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे मोठे योगदान

पुण्यातील भोरमधील माळवाडी गावातील प्रगतशील शेतकरी किरण यादव यांनी एसआरटी पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली यशस्वी शेतीची पाहणी करण्यासाठी परदेशी अभ्यासकांनी भेट दिली.यावेळी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी डॉक्टर संतोष भोसले आणि डॉक्टर विवेक भोईटे उपस्थित होते.कृषी विज्ञान केंद्राकडून शून्य मशागत शेती मार्गदर्शन आणि शिवार भेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यामुळे येथील प्रगतशील शेतीचे उदाहरण आता जगभर दिले जाणार आहे. शिवाय या भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा हा उद्देश कृषी विज्ञान केंद्राचा राहणार आहे.

शेतीची पाहणी अन् तरुणाच्या उपक्रमाचे कौतुकही

एस.आर. टी तंत्रज्ञान वापरून करत असलेल्या आधुनिक शेतीची पाहणी करण्यासाठी परदेशी पाहुणे चेरी टेन हे सिंगापूरहून तर एडम ब्लाईट ऑस्ट्रेलियाहून माळवाडी शिवारात दाखल झाले होते. त्यांच्याबरोबर सुहास जोशी या बायर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि माळवाडी गावचे तरुण प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी किरण यादव यांच्या उत्पादनवाढीसाठी केलेल्या प्रयोगांचे कौतुक केले. या प्रसंगी केवीके बारामती येथील डॉक्टर संतोष भोसले आणि डॉ. विवेक भोईटे उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

Sugarcane : उसाची तोड झाली, मग खोडव्याचे व्यवस्थापन करा अन् उत्पादन वाढवा

PM kisan Yojna : शुभ मुहूर्तावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता! राज्य शासनाकडून याद्यांची पूर्तता

Akola : मका पिकाने शेतकऱ्यांना भरभरुन दिले, मुख्य पिकांतून नाहीपण हंगामी पिकातून शेतकऱ्यांचे साधले

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.