LIVE : शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुंबई : शेतकरी आणि आदिवासींचा विविध मागण्यांसाठी मुंबईत आलेला ‘उलगुलान मोर्चा’ आज मंत्रालयावर धडकणार आहे. सोमय्या मैदानात रात्र काढल्यानंतर पहाटे शेतकरी आणि आदिवासींनी आझाद मैदानाकडे कूच केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ‘जेल भरो’ करणार असल्याचा इशाराही आंदोलक शेतकरी, आदिवासांनी दिला आहे. LIVE UPDATE : – जमीनपट्ट्यासंदर्भातील विषय महत्त्वाचा आहे – गिरीश महाजन – विखे […]
मुंबई : शेतकरी आणि आदिवासींचा विविध मागण्यांसाठी मुंबईत आलेला ‘उलगुलान मोर्चा’ आज मंत्रालयावर धडकणार आहे. सोमय्या मैदानात रात्र काढल्यानंतर पहाटे शेतकरी आणि आदिवासींनी आझाद मैदानाकडे कूच केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ‘जेल भरो’ करणार असल्याचा इशाराही आंदोलक शेतकरी, आदिवासांनी दिला आहे.
LIVE UPDATE :
– जमीनपट्ट्यासंदर्भातील विषय महत्त्वाचा आहे – गिरीश महाजन
– विखे पाटील, गिरीश महाजन यांच्यासोबत 15 जणांचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
– शेतकऱ्यांचं 15 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार
– दहा ते वीस मिनिटात #उलगुलानमोर्चा आझाद मैदानात पोहोचेल
VIDEO : मुंबईत अन्नदात्यांचा एल्गार, विविध मागण्यांसाठी शेतकरी-आदिवासी राजधानीत! #उलगुलानमोर्चा pic.twitter.com/5u6RZoXzKB
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 22, 2018
– शेतकरी, आदिवासींचा मोर्चा भायखळ्याच्या पुढे पोहोचला, आझाद मैदानाकडे कूच
– आदिवासी आणि शेतकरी मोर्चा भायखळ्यातील राणीबाग येथे पोहचला
मोर्चामुळे वाहतुकीत बदल :
- दक्षिण मुंबईहून दादरकडे येणाऱ्या वाहनांना सर्व्हिस रोडचा वापर करण्याचं मुंबई पोलिसांचे आवाहन
- जे जे फ्लाईओवर, लालबाग फ्लायओव्हर आणि परेल फ्लायओव्हरवर येथून वाहतूक प्रवास टाळावी
- सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु
- सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान आझाद मैदान परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
मागण्या काय?
1) उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव मिळावा व तो मिळण्यासाठी न्यायिक व्यवस्था तयार करण्यात यावी.
2) पिढ्यानपिढ्या वनजमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांना वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्वरित त्या जमिनीचे मालक बनवण्यात यावे. व त्यानंतर त्यांच्या जमिनी सुधारण्यासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करून त्याचा आराखडा सादर करावा
3) विजेवर सर्वांचा समान अधिकार असल्यामुळे शहराप्रमाणेच शेतकऱ्यांना सुद्धा समान लोड शेडींग असावी. व शेतकऱ्यांना वीजपुरवठा दिवसा करण्यात यावा
4) वनपट्टे धारकांना व ज्यांचे वन दावे प्रलंबित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत व पिक कर्ज मिळावे. कारण ही मदत एकूण शेती व्यवसाय तोट्यात असल्यामुळे देण्यात येते त्यामुळे त्यांचा या मदतीवर अधिकार आहे.
5) पेसा कायद्यामध्ये शेड्युल्ड 5 अंतर्गत येणाऱ्या गावांची पुनर्रचना करून वगळण्यात आलेली गावे समाविष्ट करून घेण्यात यावी .
6) दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून त्यांनी आता केलेले शुल्क परत मिळावे.
7) दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील किंवा त्यावरील असा भेदभाव न करता सरसकट दोन रुपये किलोने धान्य मिळावे.
8) आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे जिरायत जमिनीला हेक्टरी 50हजार व बागायत जमिनीला हेक्टरीएक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे
9) 2001 पूर्वी कसत असलेल्या गायरान जमीन धारकांना कायदेशीर पूर्तता करून कसत असलेल्या गायरान जमिनी चे त्यांना मालक बनविण्यात यावे व तोपर्यंत त्यांना पिक कर्ज नुकसान भरपाई हे लाभ देण्यात यावे
10) दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना व स्वाभिमान सबलीकरण योजना या अंतर्गत महाराष्ट्रात येत्या काळात किती दलित व आदिवासिंना जमीन मिळणार आहे याचा आराखडा सादर करावा.