Vegetable Price : पेट्रोल-डिझेलच्या पंगतीमध्ये हिरव्या मिरचीचाही ठसका, लिंबाचा आंबटपणाही कायम..!

महागाई म्हणलं की जसे पेट्रोल- डिझेल ही नावे आपसूकच तोंडी येतात त्यामध्ये आता लिंबू आणि मिरचीची भर पडली आहे. लिंबाने तर यंदा हंगामाच्या सुरवातीपासूच आपला तोरा कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे गेल्या महिन्याभरात मिरचीचच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत 100 किलो मिरची तर 20 रुपयांना 3 लिंबू अशी अवस्था आहे. लिंबाच्या वाढीव दराचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत नसून यामध्ये व्यापारी आणि करिकोळ विक्रेत्यांचीच चांदी होत आहे. घटलेल्या उत्पादनाचा बाऊ आणि वाढत्या मागणीचा फायदा हे व्यापारी घेत आहेत.

Vegetable Price : पेट्रोल-डिझेलच्या पंगतीमध्ये हिरव्या मिरचीचाही ठसका, लिंबाचा आंबटपणाही कायम..!
उत्पादनात घट झाल्यामुळे यंदा मिरचीच्या लक्षणीय वाढ झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 4:41 PM

बुलडाणा : महागाई म्हणलं की जसे पेट्रोल- डिझेल ही नावे आपसूकच तोंडी येतात त्यामध्ये आता (Lemon & Chilly) लिंबू आणि मिरचीची भर पडली आहे. लिंबाने तर यंदा हंगामाच्या सुरवातीपासूच आपला तोरा कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे गेल्या महिन्याभरात मिरचीचच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. सध्या (Market) खुल्या बाजारपेठेत 100 किलो मिरची तर 20 रुपयांना 3 लिंबू अशी अवस्था आहे. लिंबाच्या वाढीव दराचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत नसून यामध्ये (Traders) व्यापारी आणि करिकोळ विक्रेत्यांचीच चांदी होत आहे. घटलेल्या उत्पादनाचा बाऊ आणि वाढत्या मागणीचा फायदा हे व्यापारी घेत आहेत. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीच्या मागणीत वाढ झाल्याने 1 किलोसाठी 100 हून अधिक रुपये हे ग्राहकांना मोजावे लागत आहेत. एकंदरीत महागाईचा मुद्दा समोर आला की लिंबू आणि मिरचीच्या दराची खमंग अशी चर्चा तर होणारच.

संपूर्ण हंगामात लिंबाचे वजन कायम

हंगामाच्या सुरवातीपासूनच लिंबाची मागणीच्या तुलनेत उपलब्धता नव्हती. वाातवरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाली होती. अवकाळी आणि वाऱ्यामुळे लिंबाची पडझड झाली होती. उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण व्यापाऱ्यांचा फायदा झाला. ग्राहक आणि शेतकरी यांच्यातील दुवा असलेल्या व्यापाऱ्याने ओढावलेल्या परस्थितीचा फायद घेतला. लिंबू 650 रुपये शेकडा तर, मिरची 100 रुपये किलोने बाजारात मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा खर्च अधिक वाढला आहे. वाढत्या महागाईचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर जाणवू लागला आहे.

मिरचीच्या दरात अचानक वाढ

सध्या बाजारपेठेत केवळ हिरव्या मिरचीचाच ठसका आहे. इतर सर्व भाजीपाल्याचे दर हे नियंत्रणात आहेत. मात्र, मिरचीने शंभरी पार केली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचाही परिणाम या भाजीपाल्यांच्या दरावर झालेला आहे. उन्हाळी हंगामात मिरचीचे उत्पादन मर्यादित क्षेत्रावरच घेण्यात आले होते. तर भर उन्हळ्यात मिरचीच्या मागणीत वाढ होत आहे.

असे आहे भाजीपाल्याचे दर

किरकोळ विक्रेत्यांकडे 20 रुपयांचे तीनच लिंबू मिळतात. तर मिरची 25 ते 30 रुपये पावशेर या भावाने विकली जात आहे. या तुलनेत कांदे व बटाट्याचे दर सर्वात कमी आहेत. साधारणत: 20 रुपये किलोने किरकोळ बाजारात विक्री होत आहे. वांगे ६० रुपये किलो, काकडी 15 रुपये किलो, भोपळा 20 रुपयांना मिळत आहे. फळभाज्यांच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसते. कोथिंबिर 20 ते 30 रुपये जुडी, मेथी, पालक, शेपू या 20 रुपये जुडी प्रमाणे मिळत आहेत. बाजारात पालेभाज्यांची आवक वाढत असल्याने त्याचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत.

संबंधित बातम्या :

Banana : यंदा केळीचा ‘गोडवा’च गायब, अस्मानी संकटानंतर आता महावितरणचा ‘शॉक’

Latur Market : शेतीमालाच्या दरात घट, शेतकऱ्यांसाठी ‘वेट अॅंण्ड वॉच’चा सल्ला..!

Chickpea : मोहिम फत्ते, हरभरा पिकाने शासकीय गोदामेही फुल्ल, शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.