ऊस लागवड करतानाच होते तोडणीचे नियोजन तरी गोदाकाठच्या ऊसाला फडातच तुरे..!

एकीकडे निसर्गाशी दोन हात करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादनावरील खर्च वाढला असून पिके जोपासायची कशी असा सवाल आहे. असे असाताना केवळ ऊसाचे नुकसान झाले नव्हते. या सर्वात मोठ्या नगदी पिकातून तरी उत्पन्न पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले साखर कारखानेच अडचणीचे ठरत आहेत.

ऊस लागवड करतानाच होते तोडणीचे नियोजन तरी गोदाकाठच्या ऊसाला फडातच तुरे..!
अतिरिक्त ऊसाच्या क्षेत्राची नोंद करण्याचा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. बीडमध्ये याला सुरवात झाली आहे.
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 12:26 PM

लासलगाव: एकीकडे निसर्गाशी दोन हात करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादनावरील खर्च वाढला असून पिके जोपासायची कशी असा सवाल आहे. असे असाताना केवळ (Sugar Cane) ऊसाचे नुकसान झाले नव्हते. या सर्वात मोठ्या (Cash Crop) नगदी पिकातून तरी उत्पन्न पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले (Sugar Factory) साखर कारखानेच अडचणीचे ठरत आहेत. ऊसाच्या नोंदणीप्रमाणे तोड तर झालीच नाही. त्यामुळे फडातच ऊसाला तुरे आले आहेत तर दुसरीकडे ऊसतोड आली तरी मुकादमाकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरु आहे. त्यामुळे ऊस फडात राहिला तरी नुकसान आणि तोड सुरु झाले तरी नुकसानच अशा दुहेरी संकटात सध्या गोदाकाठचा शेतकरी आहे. ऊसतोड पूर्ण झाल्याशिवाय गाळप बंद होणार नसल्याचे ठणकावून सांगितले जात असले तरी फडातील स्थिती ही वेगळीच आहे. त्यामुळे वेळेत ऊसाची तोड होण्यासाठी यंत्रणा राबवण्याची मागणी होत आहे.

नोंदणी केलेल्या ऊसालाही तुरे

यंदा विक्रमी ऊसाचे गाळप झाले असल्याचा गाजावाजा साखर आयुक्त कार्यालयाकडून केला जात असला तरी शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. ऊस लागवड करतानाच ऊसतोडीचे होते नियोजन केले जाते. ऊस लागवडीच्या तारखेची नोंद ही संबंधित कारखान्याकडे केली जाते. त्यानुसारच ऊस तोडणीचा कार्यक्रम हा ठरला जातो. लागवड केल्यापासून 12 ते 13 महिन्यांमध्ये ऊसतोड झाली तर अपेक्षित वजन आणि दरही मिळतो. पण ऊसतोडणीला सुरवात झाली की, स्वहीत साधत कारखान्याकडून मनमानी कारभार केला जातो. त्यामुळे नोंदणी केलेला ऊस फड़ात अन् गेटकेनचा ऊसाचे गाळप अशी अवस्था होत आहे.

शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

कालावधी पूर्ण होऊनही ऊस फडातच असल्याने आता वजनात घट ही ठरलेलीच आहे. सध्या गोदाकाठच्या ऊसाला लागवड करुन 15 ते 16 महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे वजनात तर घट झालीच आहे पण याचा उताऱ्यावर परिणाम होत आहे. शिवाय आता तोड आली तरी अगोदर मुकादमच पैशाची मागणी करीत आहे.ऊसतोडीला सुरवात होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना कामगार आणि मुकादमाला पैसे पुरवावे लागत आहेत.

नुकसानीला जबाबदार कोण?

ऊस तोडणीला उशीर झाल्यामुळे उसाला तुरे फुटू लागल्याने ऊस उत्पादकांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. नोंदणी करून देखील साखर कारखाने ऊस नेण्यास टाळाटाळ करीत असल्याने तसेच मुकादम मनमानी करून ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी करीत असल्याने निफाड तालुक्यातील जवळपास दोन लाख टनपेक्षा तोडणी योग्य ऊस शेतात उभा आहे. या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राम राजोळे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या  :

नाबार्डचा पतपुरवठा : ‘कृषी’ क्षेत्रासाठी 1 लाख 43 हजार कोटींची तरतूद, काय आहेत धोरणे?

Turmeric Crop : हळद पीक एक अन् समस्या अनेक, यंदा उत्पादन निम्म्यावरच, काय आहेत कारणे ?

लेट पण थेट : उन्हाळी सोयाबीन फुलोऱ्यात, काय आहे कृषी विभागाचा सल्ला?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.