थंडी सुरु होताच लाळ्या खुरकताचा धोका वाढला, जनावरांची योग्य देखभाल हाच उत्तम पर्याय
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातही याचा धोका वाढल्याने राज्यभर लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे. शिवाय हा रोग संसर्गजन्य असल्याने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गतवर्षी कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणाच्या मोहीमेला खंड पडला होता. मात्र, यंदा लसीकरणाला सुरवात झाली आहे.
सोलापूर : पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात आणि थंडीला सुरवात होताच (Animal epidemics) लाळ्या आणि खुरकताचा धोका हा वाढतो. यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाच्यावतीने लसीकरण सुरु करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोलापूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातही याचा धोका वाढल्याने (vaccination by administration) राज्यभर लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे. शिवाय हा रोग संसर्गजन्य असल्याने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गतवर्षी कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणाच्या मोहीमेला खंड पडला होता. मात्र, यंदा लसीकरणाला सुरवात झाली आहे.
जनावरांच्या लसीकरणाबरोबरच घ्यावयाच्या काळजीबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कारण केवळ लसीकरणच नाही तर यामध्ये लहान बाबींही महत्वाच्या आहेत. जनावरांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा लस देऊनही त्याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लसी बरोबरच पशूंची घ्यावयाची काळजी ह्या महत्वाच्या बाबी आहेत.
सोलापूर जिल्ह्यासाठी 12 लाख डोस
जनावरांच्या जनगणनेनुसार हे डोस जिल्हानिहाय दिले जातात. केंद्र सरकारच्यावतीने ही लस पुरवली जाते. दुभत्या जनावरांना याचा अधिकचा धोका असल्याने पशूसंवर्धन विभागाच्यावतीने लसीकरण सुरु केले आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी 12 लाख 41 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. शिवाय 1 नोव्हेंबरपासून या मोहीमेला सुरवात झाली असून आतापर्यंत 38 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले होते.
दुर्लक्ष केल्यास जनावर दगावण्याचा धोका
लाळ्या-खुरकत हा साथीचा आजार आहे. तो जनावरांना कोणत्याही संपर्कातून होतो. हे पशूसंवर्धन विभागाच्या निदर्शनास आलेल आहे. त्यामुळेच पावसाळा सुरु झाला की या लसीकरणाला सुरवात केली जाते हा दुसरा टप्पा सुरु आहे. पावसाळ्याच्या तोंडावर लसीकरणात आले होते तर आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लसीकरण मोहीम सुरु आहे. जर लाळ्या-खुरकताची लागण होऊनही शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले असेल तर जनावरं दगावण्याचाही धोका आहे. मात्र, याबाबत प्रशासन अधिक सतर्क झाले असून या साथीच्या आजाराची लागण होण्याच्या आगोदरच लसीकरण केले जात आहे.
ही आहेत लाळ्या खुरकुताची लक्षणे
* खुरकुताची लागण झाली की जनावर हे शांत राहते नियमितपणे चारा खात नाही पाणी पिणे बंद करते तर दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी होते. * या दरम्यानच्या काळात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात तर गाभण जनावराच्या मागच्या पायात हे फोड आले तर अपंगत्वसुध्दा येऊ शकते.
हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
* आजही ग्रामीण भागात जनावराने अधिकची लाळ गाळली तर चप्पल जीभेवर घासली जाते. मात्र, असे न करता जर या आजाराची साथच सुरु असेल तर जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. किंवा ज्या जनावराला आजार झाला आहे त्याच्या शेजारी निरोगी जनावर हे बांधू नये किंवा त्याचा चाराही त्याला देऊ नये कारण लाळ्या आजार हा लाळेपासूनच पसरतो. * लाळ्या खुरकत झालेल्या जनावरांपासून निरोगी जनावरे ही वेगळी बांधणे आवश्यक आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता त्याची स्वतंत्र सोय करावी
* ज्या ठिकाणी या आजाराने प्रादुर्भाव झालेली जनावरे बांधलेली असतात ती जागा दिवसातून किमान एकदा जंतुनाशकाने स्वच्छ धुवावी. * जनावरांचे दूध काढण्याचे भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुऊन घ्यावीत. भांड्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोगप्रसार टळेल. * जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यता होत नाही.
संबंधित बातम्या :
ज्वारीच्या पेऱ्यात घट, यंदाच्या रब्बीत गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार
उत्तर भारतामधील राजमा वाढतोय महाराष्ट्रातील रब्बीच्या हंगामात