मराठवाड्यातील नुकसानभरपाईसाठी आवश्यकता अडीच हजार कोटींची, अन्

राज्य सरकारने अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी 10 हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात झालेले नुकसान आणि स्थानिक प्रशासनाने केलेली मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तब्बल 36 लाख 72 हजार हेक्टरावरील पीकांचे नुकसान झाले होते. त्याअनुशंगाने विभागीय प्रशासनाने 2 हजार 585 कोटीं रुपयांच्या नुकसानभरपाईचा अहवाल सपूर्द केला होता.

मराठवाड्यातील नुकसानभरपाईसाठी आवश्यकता अडीच हजार कोटींची, अन्
Crop Damaged
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 10:47 AM

लातूर : राज्य सरकारने (State Government) अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे (Heavy Rain) झालेल्या नुकसानभरपाईपोटी 10 हजार कोटींची घोषणा केली आहे. (Kharif Hangam) मात्र, प्रत्यक्षात झालेले नुकसान आणि स्थानिक प्रशासनाने केलेली मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे तब्बल 36 लाख 72 हजार हेक्टरावरील पीकांचे नुकसान झाले होते. त्याअनुशंगाने विभागीय प्रशासनाने 2 हजार 585 कोटीं रुपयांच्या नुकसानभरपाईचा अहवाल सपूर्द केला होता. त्यामुळे 10 हजार कोटीतून मराठवाड्याच्या वाटेला किती रुपये येतात हे पहावे लागणार आहे.

अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलेला होता. खरीपातील सोयाबीन आणि उडीद ही मुख्यपिके वावरात असतानाच अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन अद्यापही पाण्यातच आहे. उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामच मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो. पावसाने नुकसान झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्याता आहे. एनडीआरएफ च्या निकषाप्रमाणे 33 टक्के पेक्षा अधिकचे नुकसान झालेले क्षेत्र हे वाढले आहे.

पावसाचे प्रमाण अधिक असल्याने हा निष्कर्ष निघाला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. एनडीआरएफ च्या मदतीपूर्वीच राज्य सरकारने पॅकेज जाहीर केली आहे. सध्याच्या परस्थितीनुसार 36 लाख 52 हजार हेक्टरावरील पीकांचे नुकसान झाले आहे तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी 2 हजार 585 कोटी रुपयांचा आवश्यकता असल्याचा अहवाल विभागीय स्तरावरून देण्यात आला आहे.

विभागनिहाय मराठवाड्याच्या पदरात किती?

पावसामुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याअनुशंगाने राज्य सरकारने बुधवारी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, मराठवाड्याती शेतकऱ्यांचे अधिकच्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या विभागातील आठ जिल्ह्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी 6 हजार कोटींची आवश्यकता आहे. मात्र, पूर्ण राज्यासाठी 10 हजार कोटी जाहीर करण्यात आले असून आता मराठवाड्याच्या वाटेला किती रक्कम येणार हे पहावे लागणार आहे. अद्यापही विभानिहाय किती निधी वितरीत होणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

80 टक्के पीकांचे नुकसान

7 सप्टेंबर ते 8 ऑक्टोंबरच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीपातील पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या कालावधीत 1 हजार 83 मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे सोयाबीन, तूर, उडीद ही पीके पाण्यात होती. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तब्बल 80 टक्क्यावरील पीकांचे नुकसान झाले होते. केवळ पीकाचेच नाही तर शेतजमिनही खरडून गेल्याच्या घटना मराठवाड्यात घडलेल्या होत्या.

एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे पॅकेज

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य केलं जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज आपण घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. (Announcement of compensation, highest loss to farmers in Marathwada, increased expectations of farmers )

संबंधित बातम्या :

वीज अंगावर पडू नये म्हणून अशी घ्या काळजी…प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

केंद्र सरकारमुळे रखडली उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई

प्रतीक्षा संपली..! ‘या’ तारखेला जमा होणार पी.एम. किसान सन्मान योजनेचा निधी तुमच्या खात्यावर

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.