Positive News: तुरीची दमदार एन्ट्री : आवकही वाढली अन् दरही, आठवड्याभरातच बदलले चित्र
शेतकऱ्यांना तुरीच्या पिकातून उत्पान्नाच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या आहेत. कारण तूर बाजारात दाखल होताच दाळ मिलर्स आणि स्टॉकिस्ट यांच्याकडून मागणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे हे शुभसंकेत मानले जात आहेत.
पुणे : खरीप हंगामातील अखेरचे पीक म्हणून (Toor Production) तुरीची ओळख आहे. यंदा खरीपाला निसर्गाच्या लहरीपणाचे ग्रहन लागले ते अद्याप रब्बी हंगामातही सुरु आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना तुरीच्या पिकातून उत्पान्नाच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या आहेत. कारण तूर बाजारात दाखल होताच (Dal Millers) दाळ मिलर्स आणि स्टॉकिस्ट यांच्याकडून मागणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे हे शुभसंकेत मानले जात आहेत. उत्पादनात घट झाली तरी त्याची कसर आता वाढीव दरातून मिळावी अशी अपेक्षा (Farmer) शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या आठवड्यापासून तुरीच्या आवकमध्ये वाढ झाली आहे तर दरातही सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात खरीपातील सोयाबीन, कापूस आणि आता तुरीच्या दरात वाढ होत असल्याने उत्पादनात घट झाली तरी त्याची झळ कमी होईल असा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तुरीचे आठवड्याभरातील चित्र
तुरीची काढणी अंतिम टप्प्यात आहे तर काढणी झाली की लागलीच विक्री असे न करता शेतकरी हे सोयाबीन आणि कापसाप्रमाणे साठवणूकीचाही प्रयोग करीत आहेत. हंगाम सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 6 हजारापेक्षा कमीच होते. मात्र, मागील आठवड्यापासून क्विंटलमागे 100 ते 200 रुपायंची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तुरीचे व्यवहार हे 5 हजार 800 पासून ते 6 हजार 500 रुपयांपर्यंत होत आहेत. ही दरातील वाढ कमी रकमेने होत असली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.
यामुळे तुरीच्या दरात होतेय सुधारणा
हंगाम सुरु झाला आणि शेतीमालाची आवक सुरु झाली की पहिल्या टप्प्यात दर हे घसरतातच. पण तुरीच्या बाबतीत असे झाले नाही. कारण आवक सुरु होताच दाळ मिलर्स आणि स्टॉकिस्ट यांच्याकडून मागणीला सुरवात झाली आहे. राज्यातील अकोला, लातूर, अमरावती बाजारपेठेत हीच अवस्था आहे. त्यामुळे दरात सुधारणा होत आहे. नव्या तुरीची आवक आता सुरु झाली असून मागणीही वाढत असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढलेला आहे.
हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 रुपये दर
राज्यात 186 केंद्रावर तुरीची खरेदी ही नाफेडच्यावतीने केली जात आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी कमी दर असल्याने केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. पण आता चित्र बदलले आहे. खुल्या बाजारपेठेत तुरीला किमान 6 हजाराचा दर मिळत आहे. शिवाय यामध्ये वाढ होत असल्याने कागदपत्रांची औपारिकता न करता शेतकरी थेट खुल्या बाजारातच तुरीची विक्री करीत आहेत. शिवाय ही तर हंगामाची सुरवात आहे. तुरीचे घटलेले उत्पादन आणि वाढत जाणारी मागणी यावरच सर्वकाही अवलंबून असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
काय सांगता ? जांभूळ उत्पादकांनाही मिळणार अनुदान, पण कशासाठी? वाचा सविस्तर
दुहेरी संकट : वाढत्या थंडीने द्राक्षांची फुगवण थांबली अन् तडकण्याचा धोकाही वाढला
काळाच्या ओघात लोप पावलेल्या ‘बरबडा’ मिरचीचा पुन्हा ठसका, काय आहे वेगळेपण?