Goat rearing : जातिवंत शेळ्यांसाठी कृत्रिम रेतन, देशातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रात
शेती या मुख्य व्यवसयातूनच नव्हे तर जोडव्यवसायातूनही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर सरकारचा भर आहे. शिवाय यासाठी संस्थाही पुढाकार घेत आहे. आता शेळीला गरिबाची गाय म्हणले जाते. पण याच गरिबाचे दिवस बदलण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी महामंडळाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. शेळ्यांच्या जातिवंत पैदाशीसाठी या महामंडळाने कृत्रिम रेतनाचा पर्याय समोर आणला आहे. याकरिता राज्यात 3 हजार केंद्र ही उघडण्यात येणार आहेत.
मुंबई : शेती या (Farming) मुख्य व्यवसयातूनच नव्हे तर जोडव्यवसायातूनही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर सरकारचा भर आहे. शिवाय यासाठी संस्थाही पुढाकार घेत आहे. आता शेळीला गरिबाची गाय म्हणले जाते. पण याच गरिबाचे दिवस बदलण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी महामंडळाने एक अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. (Goat) शेळ्यांच्या जातिवंत पैदाशीसाठी या महामंडळाने (Artificial sand) कृत्रिम रेतनाचा पर्याय समोर आणला आहे. याकरिता राज्यात 3 हजार केंद्र ही उघडण्यात येणार आहेत.यामुळे जातिवंत शेळ्यांचे महत्व तर टिकून राहिलच पण शेळीपालन करणाऱ्यांना त्याचा अधिकचा फायदा होणार आहे. राज्यातील पशूवैद्यकीय दवाखान्यात ही कृत्रिम पध्दत राबवली जाणार आहे. सध्या राबवण्यात येत असलेल्या या प्रयोगात अशा पध्दतीने 60 टक्के शेळ्यांमध्ये गर्भधारणा झालेली आहे.
शेळ्यांचे दूध अन् मांस गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम
शेळीपालन व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण त्या तुलनेत शेळ्यांच्या मांसची गुणवत्ता वाढवली तर अधिकचा फायदा होणार आहे. शिवाय शेळ्यांच्या दुधावरही हा प्रयोग केला जाणार आहे. हा अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला असून देशातला पहिलाच उपक्रम आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते. शिवाय मांसची वाढती मागणी बाजारपेठेत जातिवंत शेळ्यांची वेगळी अशी ओळखच राहिलेली नाही. त्यामुळे व्यावसायिकांचे उत्पन्न वाढावे आणि शेतकऱ्यांना मोठा आधार मिळावा हा मागचा हेतू आहे.
तीन जातीच्या रेतमात्रा उपलब्ध
सध्या सर्वत्रच शेळ्यांची गर्भधारणा ही स्थानिक जातीच्या बोकडाकडूनच होते. राज्यातील एकूण असलेल्या शेळ्यांपैकी 70 टक्के शेळ्या ह्या 300 मिलीपेक्षा अधिकचे दूध देत नाहीत. शिवाय शेळी आणि बोकडाचे वजन हे देखील 30 ते 35 किलोपर्यंतच असते. अशा शेळ्यांमध्ये आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत उस्मानाबादी, जमनापारी आणि दामस्कहून आयात केलेल्या रेतनाद्वारे कृत्रिम रेतन करण्यात येणार आहे.
4 हजार 848 दवाखान्यात कृत्रिम रेतन
राज्यात सध्या 4 हजार 848 पशूवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्याच्या माध्यमातून 3 हजार कृत्रिम रेतन केंद्र उभारली जाणार आहेत. एवढेच नाही तर या महामंडळाच्या माध्यमाचा महिलांसाठी शेळी सखी हा उपक्रम आहे. यामाध्यमातून महिलांना कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रयोग देशासाठी नवीन असून यामधून क्रांती घडेल असा विश्वास आहे.
संबंधित बातम्या :
Latur Market : सोयाबीनचे स्थिरच, हरभऱ्याच्या दरवाढीमागे कारण काय? शेतकऱ्यांची सावध भूमिका