कांद्याची आयात होताच दरात घसरण, सहा महिने साठवणूक करुनही कवडीमोल दर
कांद्याचे दर नियंत्रणात रहावे म्हणून कांद्याची आयात करण्याची परवानगी व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे. याचा थेट परिणाम आता कांद्याच्या दरावर जाणवू लागला आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथे गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तब्बल 350 रुपयांची घसरण झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मात्र, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येईल अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक : दर वाढीने कधी ग्राहकांच्या डोळ्यात तर कधी रात्रीतून दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याच्या दरावर सरकारच्या निर्णयाचा परिणाम झालेला आहे. कांद्याचे दर नियंत्रणात रहावे म्हणून (Import of onions) कांद्याची आयात करण्याची परवानगी व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे. याचा थेट परिणाम आता कांद्याच्या दरावर जाणवू लागला आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या ( Lasalgaon) लासलगाव येथे गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तब्बल 625रुपयांची घसरण झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मात्र, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येईल अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने साठवणुकीतला कांदा विक्रीसाठी बाहेर काढला होता. तसेच वेळप्रसंगी कांद्याची आयात करुन दर नियंत्रणात आणले जातील असेही गतआठवड्यात स्पष्ट केले होते. त्यानुसार आता इराण, तूर्की , अफगाणिस्थानसह इतर देशातून कांदा आयात करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून शेतकऱ्यांची चिंता ही वाढलेली आहे.
यासाठीच केला होता का अट्टाहास?
नाशिकसह जिल्हा भरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याला दर नव्हता म्हणून त्याची कांदा चाळीत साठवणूक केली होती. शिवाय मध्यंतरी पावसामुळेही साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले होते. आता कुठे दर वाढत असताना उत्पादनावर झालेला खर्च तरी पदरी पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यानुसार दरही वाढत होते. मात्र, आता कांद्याच्या आयातीला परवानगी दिल्याने दरात मोठी घसरण होऊ लागली आहे. गेल्या सहा महिन्यापासून योग्य दराच्या प्रतिक्षेत साठवणूक केली मात्र, सरकारच्या एका निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दोन दिवसातच 625 रुपयांची घसरण
गुरुवापपर्यंत लासलगाव येथील बाजारपेठेत कांद्याला चांगला दर होता. मात्र, कांद्याच्या आयातीला सुरवात होताच दरात घसरण सुरु झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत शनिवारी 625 रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे अशीच घसरण सुरु राहिली तर उत्पन्न तर सोडाच पण वाहतूकीचा खर्चही निघणे मुश्किल होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. मध्यंतरी काहीसा दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजार समितीत 371 वाहनातून 5 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. याला कमाल 2575 , किमान 900 तर सर्वसाधारण 2100 रुपये इतका प्रतिक्विंटलला दर मिळाला होता.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने हाहाकार माजवला आहे. सप्टेंबर महिन्यात दोन-दोनदा अतिवृष्टी झाली. ढगफुटीसारख्या पावसाने गोदावरीला चार पूर आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यापायी मंजूर झालेले अनुदान अजूनही अनेकांना मिळाले नाही. या संकटातून सावरत नाही तोच केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय घेतला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कांद्याची आयात झाली तर कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन उभारणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला होता.
संबंधित बातम्या :
घरच्याच सोयाबीन बियाणाची उगवण चांगली, काय आहे कृषी विभागाचा उपक्रम ?
सकारात्मक : लातूरमध्ये सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही, आता शेतकऱ्यांचीच भूमिकाच महत्वाची